शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

कांदा पुन्हा चढणार काट्यावर, आजपासून लिलाव सुरू; आश्वासनानंतर व्यापाऱ्यांचा बंद मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 09:29 IST

व्यापाऱ्यांची भूमिका केंद्राकडे मांडणार

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: कांदा निर्यात शुल्कावरून नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेला बेमुदत  बंदचा निर्णय अखेर मागे घेतला असून, गुरुवारपासून कांदा लिलाव सुरू करण्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे जोपर्यंत निर्यात शुल्क कमी केले जाणार नाही, तोपर्यंत विरोध कायम राहणार असल्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली.

कांद्याच्या प्रश्नावर गेल्या दोन दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले असून, व्यापारी, शेतकरी संघटना तसेच राजकीय पक्षांकडून ठिकठिकाणी आंदोलने केली जात  आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी भूमिका मांडली. नाफेडचे अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.

व्यापाऱ्यांची भूमिका केंद्राकडे मांडणार

कांदा व्यापाऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय होण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे हा प्रश्न मांडणार असल्याचे  आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी दिले. 

कुठे काय झाले...

  • सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जाेरदार आंदाेलन केले.
  • अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुका काँग्रेसने कांद्याच्या माळा गळ्यात घालून निर्यात शुल्क वाढीचा निषेध केला आणि घोषणाबाजी केली.
  • हिंगोलीत स्वाभिमानी संघटनेने गोरेगाव येथे कांदे जाळून निषेध केला. तुळजापूर (जि. धाराशिव) येथे कांदा निर्यात कर अध्यादेशाची होळी करण्यात आली.

केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन दिल्याने आम्ही आंदोलन मागे घेत आहोत.- खंडू देवरे, अध्यक्ष, कांदा व्यापारी असोसिएशन

कांद्याचे ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करत नाही तोपर्यंत काॅंग्रेससह विराेधी पक्षांचा संघर्ष सुरूच राहील.- नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

टॅग्स :onionकांदाStrikeसंपBharati pawarभारती पवार