शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेची एक जागा अजित पवार गटाला; फडणवीस यांच्या विधानाने चर्चा; अंतिम निर्णय दिल्लीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 06:03 IST

राज्यसभेची एक जागा आमच्याच पक्षाला मिळणार असा पुनरुच्चार अजित पवार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यसभेच्या ३ सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीत महायुतीमध्ये एक जागा अजित पवार गटाला दिली जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे एकच जागा भाजपच्या वाट्याला येईल, असे म्हटले जाते.केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे भाजपचे राज्यसभा सदस्य लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. विधानसभा सदस्यांमधून ते राज्यसभेवर निवडून गेले होते. आता या २ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

सातारा लोकसभेची जागा २०१९ मध्ये राष्ट्रवादीने (श्रीनिवास पाटील) जिंकली होती. ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह अजित पवार गटाने महायुतीत धरला होता. मात्र, भाजपने उदयनराजे भोसलेंसाठी ही जागा आपल्याकडे घेतली. त्याचवेळी, ‘आम्ही लोकसभेची सातारची जागा भाजपला सोडली. त्या बदल्यात राज्यसभेची उदयनराजेंची जागा भविष्यात रिक्त झाल्यास ती आम्हाला देण्याचा शब्द भाजपने दिला’ असे लोकसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते.

जागा आमच्याच पक्षाला 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी, अजित पवारांच्या दाव्याला पुष्टी दिली. सातारची जागा आमच्याकडे घेताना राज्यसभेची भविष्यात रिक्त होणारी जागा आम्ही अजित पवार गटाला देऊ असा शब्द दिलेला होता, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र, या बाबतचा अंतिम निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेची एक जागा आमच्याच पक्षाला मिळणार असा पुनरुच्चार अजित पवार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. 

जानकरांच्या नावाचीही चर्चा

अशीही चर्चा आहे की नितीन पाटील यांच्याऐवजी माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. जानकर यांनी अजित पवार गटाच्या कोट्यातून परभणीमधून लोकसभा निवडणूक लढविली होती पण ते पराभूत झाले होते. त्यांना विधान परिषदेवर पाठविले जाईल, असे म्हटले जात होते पण त्यांना संधी दिली गेली नाही.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRajya Sabhaराज्यसभा