शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
3
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
4
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
5
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
6
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
7
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
8
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
9
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
10
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
11
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
12
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
13
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
14
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
15
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
17
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
18
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
19
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
20
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!

शहापूरजवळ अपघातात एक ठार, चौघे गंभीर

By admin | Updated: April 9, 2017 21:05 IST

सावदा येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या भारती महाजन या आपल्या नातेवाईक व मुलासोबत मुंबई (शहापूर) येथे जात असताना

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 9 - सावदा येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या भारती महाजन या आपल्या नातेवाईक व मुलासोबत ठाणे (शहापूर) येथे जात असताना गतिरोधकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात महाजन यांचा मुलगा विजय किरणकांत महाजन (वय १६) हा जागीच ठार झाला असून वाहनातील अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात रविवारी सकाळी शहापूरजवळ घडला.या अपघाताबाबत प्राप्त माहिती अशी की, शनिवार, ८ रोजी विजय याची इयत्ता दहावीची (सीबीएसई) परीक्षा संपल्यावर प्राचार्या भारती महाजन या आपल्या गाडी (क्ऱएम.एच.१९ यूबी आर.४) ने मुलगा विजय, वडिल मधुकर पुंजो चौधरी, भाऊ राजेंद्र मधुकर चौधरी व चालक गणेश बऱ्हाटे यांना सोबत घेऊन शनिवारी रात्रीच शहापूर (मुंबई) कडे रवाना झाल्या होत्या. रविवारी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गतिरोधकावर वाहन आदळून अपघात झाला़ त्यात प्राचार्य भारती महाजन यांचा मुलगा विजय हा जागीच ठार झाला तर वाहनातील अन्य गंभीर जखमी झाले. त्यात प्राचार्या महाजन यांच्या पायाला तर चालक बऱ्हाटे यासदेखील गंभीर दुखापत झाली आहे़ सर्व जखमींना तत्काळ उपचारासाठी ठाणे येथील क्रिटीकल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच प्राचार्या यांचे पती किरणकांत, आई तसेच अन्य नातेवाईक व इंग्लिश मीडियमचे शिक्षक वर्ग मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली. पोटात रक्तस्त्राव झाल्याने विजयचा मृत्यूचारचाकी गाडी ही गतिरोधकावर आदळल्याने गाडीत बसलेले सर्वच गंभीर जखमी झाले त्यात विजय याच्या पोटात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर प्राचार्या महाजन यांच्या पायाला गंभीर इजा झाली असून सर्व जखमींवर ठाण्याच्या क्रिटीकल रुग्णालयात उपचार सुरू आहे. या रुग्णालयात डॉ.उल्हास पाटील यांची कन्या डॉ.केतकी, जावई वैभव व पुतण्या समर हे ठाण मांडून आहे व तज्ञ डॉक्टरांचे पथक सर्वांवर उपचार करत असल्याची माहिती स्वत: डॉ.उल्हास पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. आज अंत्यसंस्कारमयत विजयवर १० रोजी सायंकाळी पाच वाजता सावदा येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील़ सावदा रोडवरील इंग्लिश मेडियम स्कूलच्या आवारातील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल.शाळेला तीन दिवस सुटीडॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलला तीन दिवस सुटी जाहीर करण्यात आली असल्याचे शाळा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. (वार्ताहर)