मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात एक ठार

By Admin | Updated: May 13, 2017 01:14 IST2017-05-13T01:14:43+5:302017-05-13T01:14:43+5:30

तालुक्यातील मौजे रेपोली गावाच्या हद्दीत महामार्गावर दापोलीकडून मुंबईकडे जाणारी कार व मुंबईकडून रत्नागिरीकडे जाणारी दुचाकी

One killed in accident on Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात एक ठार

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात एक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
माणगाव : तालुक्यातील मौजे रेपोली गावाच्या हद्दीत महामार्गावर दापोलीकडून मुंबईकडे जाणारी कार व मुंबईकडून रत्नागिरीकडे जाणारी दुचाकी यांची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर चौघे जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
शुक्रवारी १२ मे रोजी सकाळी ८.१५ वाजता मौजे रेपोली गावचे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर सुबोध गायकर (४७, रा. वरळी, मुंबई) हे दापोली ते मुंबई असे गोवा-मुंबई महामार्गावरून इको कार (एम.एच.०१/सी.डी.०२९३) ही चालवित घेऊन जात असताना मुंबईकडून गोवा दिशेकडे जाणारा मोटारसायकल (एम.एच.४८/यू.१६९१) चालक जनार्दन तोरसकर (२७, रा. मोसम, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांनी मोटारसायकल चुकीच्या बाजूला आणल्याने मोटारसायकल आणि इको कार यांची धडक होवून मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला, तर त्याच्या पाठीमागे बसलेली त्याची पत्नी जान्हवी तोरसकर तसेच इको कारमधील चालक सुबोध गायकर व यांची पत्नी श्वेता गायकर आणि त्यांच्याबरोबर मनोहर तांबडे जखमी झाले असून उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पो.ना. पी.एस.पवार हे करीत आहेत.

Web Title: One killed in accident on Mumbai-Goa highway