शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतून शंभर याचिका

By admin | Updated: February 28, 2017 01:54 IST

मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) घोटाळा झाल्याचा आरोप पुणे महापालिकेपाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी केला

पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) घोटाळा झाल्याचा आरोप पुणे महापालिकेपाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी केला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय भाजपा वगळता सर्वपक्षीय उमेदवार आणि नेत्यांनी घेतला. किमान १०० याचिका न्यायालयात दाखल करून मोर्चाही काढण्यात येणार आहे.पिंपरी येथील नारायण मेघाजी लोखंडे भवनात आज दुपारी साडेबाराला सर्वपक्षीय नेत्यांची सभा झाली. या वेळी महापौर शकुंतला धराडे, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर योगेश बहल, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, नाना काटे, माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे, विलास नांदगुडे, फजल शेख, शिवसेनेचे मारुती भापकर, भगवान वाल्हेकर उपस्थित होते. भाजपाने ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला. या वेळी कोळसे-पाटील यांनी ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा होऊ शकतो,हे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच मान्य केल्याचे उपस्थितांना सांगितले. कोळसे पाटील म्हणाले, ‘‘जगातील बहुतांश ठिकाणी ईव्हीएम मशिनद्वारे निवडणुका घेतल्या जात नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही निवडणूक आयोगाने मशिन बदलल्या नाहीत. याबाबत आयोगाकडे विचारणा केली असता सरकार पैसे देत नसल्याचे सांगितले. याचिका दाखल करताना ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा झाल्याचा सबळ पुरावा असला पाहिजे. तो पाहून न्यायालय दखल घेईल. निवडणूक अधिकारी, निवडणूक आयुक्त, महापालिका आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे तक्रार द्यावी. भविष्यात बॅलेटचा वापर करावा. त्यानुसार निवडणूक घेण्याची मागणी करावी. न्यायालयाच्या आदेशाचा निवडणूक आयोगाने अवमान केला आहे.’’(प्रतिनिधी)>संजोग वाघेरे : ही तर जनता आणि लोकशाहीची फसवणूक आहे.मारुती भापकर : सत्तेच्या गैरवापराने लोकशाही कमकुवतचा प्रयत्न सचिन साठे : भाजपाकडून नाही, तर ईव्हीएम मशिनकडून पराभव प्रशांत शितोळे : भाजपाने बॅलेट पेपरद्वारे निवडून येऊन दाखवावे.