शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा आठवड्यातील एक दिवस आता अंगणवाडीत! प्राथमिक शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 02:23 IST

अंगणवाडी केंद्राजवळील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आता आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पूर्व बालशिक्षण व संगोपन या विषयावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

संतोष वानखडे वाशिम : अंगणवाडी केंद्राजवळील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आता आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पूर्व बालशिक्षण व संगोपन या विषयावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून अंगणवाडी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. येथे पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जातात.अंगणवाडीतील बालकांना प्राथमिक शिक्षणाची ओळख व्हावी, पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी मुले शैक्षणिकदृष्ट्या परिपक्व व्हावी, यासाठी आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना आठवड्यातील एक दिवस अंगणवाडीतील बालकांसाठी द्यावा लागणार आहे. अंगणवाडी केंद्रातील बालकांसाठी विद्या प्राधिकरण पुणे यांच्या समन्वयाने पूर्व शालेय शिक्षणासाठी आकार अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना स्थानिक पातळीवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची मदत घ्यावी लागणार आहे.यादृष्टीने प्राथमिक शिक्षकांनी अंगणवाडी सेविकेला प्राथमिक शिक्षण स्तरावरील शैक्षणिक गरजा विचारात घेऊन मार्गदर्शन करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिलेल्या आहेत.आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पूर्व बालशिक्षण व संगोपन या विषयावर लक्ष केंद्रित करून संबंधित अंगणवाडी सेविकेला मार्गदर्शन करावे लागणार आहे.शाळेत साजरे होणारे विविध उत्सव, समारंभ, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी आदी कार्यक्रमांच्या वेळी अंगणवाडीतील मुलांना बोलावून त्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे लागणार आहे. प्रत्येक वर्षी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर अंगणवाडी केंद्रामधील ३ ते ४ वर्षे, ४ ते ५ वर्षे व ५ ते ६ वर्षे या वयोगटाप्रमाणे आकार अभ्यासक्रम पूर्ण केल्याबाबतची खात्री अंगणवाडी केंद्राजवळील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना करावी लागणार आहे.‘आकार अभ्यासक्रम’ पूर्ण करणाºया मुलांना शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यानंतर या मुलांना पहिल्या वर्गात सहजपणे प्रवेश मिळणार आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक