नागपूर: लोकमतनागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे व्याख्यान आज, रविवारी सायंकाळी ७ वाजता रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित करण्यात आले आहे. ‘हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर डॉ. भागवत आपले विचार मांडतील. कोविड प्रतिबंधांमुळे शासकीय निर्बंधांचे पूर्णपणे पालन करीत हा कार्यक्रम होणार असून निवडक मान्यवरांनाच प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार आहे. लोकमतच्या फेसबूक पेजवर LokmatNagpur (https://www.facebook.com/LokmatNagpuronline/), Lokmat(https://www.facebook.com/lokmat/) व युट्यूबरही (https://youtube.com/c/Lokmat) हा सोहळा थेट पाहता येईल.
लोकमत सुवर्ण महोत्सव; डॉ. मोहन भागवत यांचे आज व्याख्यान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 12:55 IST