शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात युनूस सरकार मावळणार, संध्याकाळी मोठी घोषणा होणार; संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं
2
महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
3
आम्हाला तर पाकिस्तान सोबत येणे शक्य, पण हे दोन देश...; नव्या समूहासंदर्भात काय म्हणाला बांगलादेश
4
'स्वाभिमानाने जगणारा कोकणातला शेतकरी आज चिंतेत', वलसाड हापूसवरून भास्कर जाधव आक्रमक
5
व्हॉट्सअ‍ॅपवरची एक चूक थेट घेऊन जाऊ शकते तुरुंगात! 'ही' गोष्ट करताना किमान दहा वेळ विचार कराच
6
पाकिस्तानमध्ये कधी येणार? 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये आलिया भटला चाहत्याचा प्रश्न; म्हणाली...
7
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन, म्हणाला- "माझ्या पत्नीला..."
8
धक्कादायक! दारुच्या नशेत होता बोगस डॉक्टर; YouTube पाहून ऑपरेशन, चुकीची नस कापली अन्...
9
Gold Silver Price Today: यावर्षी सोनं ₹५२,७९५ आणि चांदी ₹१००९३६ रुपयांनी महागली; आजही दरानं तोडले सर्व विक्रम, पाहा किंमत
10
पुढील वर्षात १ तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? ब्रोकरेज फर्मने सांगितला मोठा आकडा
11
लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...
12
व्हॉट्सअप चॅट्स वाचण्यासाठी...! डीएसपी 'कल्पना वर्मा' यांच्या 'लव्ह ट्रॅप' प्रकरणात 'Love U यार...' ची एन्ट्री...
13
Geminid Meteor Shower: १३,१४ डिसेंबर ठरणार इच्छापूर्तीची रात्र; आकाशाकडे बघून करा 'हे' काम!
14
'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय
15
माइंडमेश समिट २०२५: विद्या-कला-नीती पुरस्कारांची घोषणा; समाजाला आकार देणाऱ्यांचा सन्मान
16
३ महिन्यांतच गमावलेलं दुसरं बाळ, पहिल्यांदाच व्यक्त झाली सुनीता अहुजा, म्हणाली- "तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा..."
17
म्यानमारमध्ये गृहयुद्धामुळे हाहाकार; रुग्णालयातील एअर स्ट्राईकमध्ये ३० जणांचा मृत्यू, ७० जखमी
18
अमेरिकेच्या संसदेत मोदी-पुतिन यांच्या 'त्या' फोटोवर खळबळ; महिला खासदाराचा ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर हल्लाबोल
19
FD चे व्याजदर कमी झाल्याने बॉन्डमध्ये गुंतवणूक करताय? 'हे' ५ मोठे धोके तुम्हाला माहीत असायलाच हवेत
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उत्साहात; मानाचे वारकरी लातूर जिल्ह्यातील 

By appasaheb.patil | Updated: November 12, 2024 08:25 IST

Kartiki Ekadashi Pandharpur: वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो असे साकडे  विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत फुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापूजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

-अप्पासाहेब पाटीलसोलापूर  -  वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो असे साकडे  विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत फुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व सायली पुलकुंडवर तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रीतम यावलकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.

शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड करण्यात आली. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील बाबुराव बागसरी सगर व सागरबाई बाबुराव सगर या दांपत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. सगर दापत्य हे  गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.  हे  दाम्पत्य मागील १४ वर्षापासून नियमितपणे वारी करीत आहे. या दाम्पत्याला विभागीय आयुक्त डॉ पुलकुंडवार यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आला. प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार  व त्यांच्या पत्नी सायली पुलकुंडवर व मानाचे वारकरी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंदिर समितीची व्यवस्थापक मनोज श्रोत्री तर सूत्रसंचालन विनया कुलकर्णी यांनी केले.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूरSolapurसोलापूर