शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लवकरच होणार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'शिवसृष्टी'च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 11:55 IST

शिवसृष्टीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवकार्यकाळ अनुभवता येणे ही शिवप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे!

>> कौस्तुभ कस्तुरे, इतिहास अभ्यासक 

'जाणता राजा' अथवा 'राजाशिवछत्रपती' ही नावं कानावर आली की श्री पुण्यश्लोक शिवरायांच्या सोबतच आणखी एका ऋषितुल्य व्यक्तीचा चेहरा मराठी माणसाच्या डोळ्यासमोर आपोआप तरळतो- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा. 

आपलं संपूर्ण आयुष्य शिवचरित्राच्या प्रसार आणि प्रचारासाठी अर्पण केलेल्या बाबासाहेबांनी आणखी एक स्वप्न पाहिलं होतं. जागतिक दर्जाची, भव्य दिव्य अशी शिवसृष्टी उभारण्याचं. शिवरायांशी संबंधीत विस्मयकारक घटना आणि गोष्टी इथे निव्वळ वाचायलाच नाही तर अनुभवायला मिळतील. बाबासाहेबांनी या स्वप्नासाठी अक्षरशः अनेक राज्य, किंबहुना काही देश पालथे घातले, तिथलं उत्तमोत्तम आपल्याकडे कसं आणता येईल याचा ते विचार करत राहिले. 

इ.स. १९७४ साली दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर बाबासाहेबांनी तात्पुरती शिवसृष्टी उभी केली होती, जिला न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद लाभला. याच पद्धतीच्या शिवसृष्टीचं रूपांतर कायमस्वरूपी करण्यासाठी बाबासाहेबांनी पुढे हालचाली सुरू केल्या. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आधीच होतं, त्यामार्फत नव्या जोमाने कामं सुरू झाली. दरम्यानच्या काळात तंत्रज्ञान बदललं, नवीन गोष्टी उजेडात आल्या, लोकांची मानसिकताही बदलली. कायमस्वरूपी शिवसृष्टी उभारायची म्हणजे जागाही तशीच हवी होती. अखेरीस, राज्य सरकारकडून बाबासाहेबांना, अर्थात प्रतिष्ठानला पुण्याजवळ आंबेगाव येथे जागा मिळाली आणि आता स्वप्नं प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हें दिसू लागली. 

गेल्या वीस वर्षात महाराष्ट्रातील राजकारण वेगळ्याच थराला गेल्याने काही काळ या शिवसृष्टीच्या प्रकल्पात खंड पडतो की काय असं वाटलं खरं, पण स्वतः बाबासाहेब आणि प्रतिष्ठान, साऱ्यांनीच आपली उमेद न हरता कामं सुरूच ठेवली. दुर्दैवाने १५ नोव्हेंबर २०२१रोजी बाबासाहेब वयाच्या ९९व्या वर्षी इहलोल सोडून गेले. पण त्यांचं अपुरं स्वप्नं पूर्ण करण्याचा ध्यास मात्र इतर साऱ्यांनीच घेतला होता. याचीच परिणीती म्हणजे येत्या २० नोव्हेंबर २०२२रोजी बाबासाहेबांच्या या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते होणार होते, परंतु काही कारणास्तव तारखेत बदल झालेला असून त्याबद्दल यथोचित माहिती प्रसार माध्यमातून लवकरच दिली जाईल. 

एकंदर साडेसहा लाख चौरस फुटाच्या प्रस्तावित बांधकामांपैकी पस्तीस हजार चौरस फुटांचा 'सरकारवाडा' आज पूर्णपणे बांधून तयार झाला आहे. एक प्रमुख चौक असलेला हा प्रचंड वाडा पाहताच आपण थेट सतराव्या शतकात जातो. जुनी कवाडं, भलेथोरले दरवाजे, कमानी, नक्षीदार छत, काचेची तावदानं आदी अनेक गोष्टींनी हा वाडा नटला आहेच, पण त्यावर साज चढला आहे तो नव्याने तयार झालेल्या शिवकाळाच्या प्रदर्शनाचा. 

शिवसृष्टीच्या या पहिल्या टप्प्यात आपल्याला निरनिराळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती ज्यावर प्रोजेक्शन्सच्या सहाय्याने हालचाली पाहता येतील, अशा पाहता येतील. याशिवाय, शिवराज्याभिषेकाचं, शस्त्रांचं स्वतंत्र दालन असेल. शिवरायांच्या साऱ्या शत्रूंची समकालीन चित्रकारांनी काढलेली लघुचित्र आपल्याला एका दालनात पाहता येतील. लंडनमध्ये असलेल्या जगदंबा तलवारीची हुबेहूब प्रतिकृती आपल्याला इथे पाहता येईल. महाराजांची आग्रा भेट आणि रायगडची हवाई सफर ही दालनं विशेषत्वाने शिवप्रेमींना आवडतीलच, पण त्याहूनही आणखी एक खास गोष्ट एका वेगळ्याच दालनात घडणार आहे. प्रत्यक्ष शिवराय आपल्याशी संवाद साधणार आहेत! कसे? ते मात्र शिवसृष्टीला भेट दिल्याशिवाय समजायचं नाही.  

हे सारं उभारण्यासाठी असंख्य हात गेले काही महिने झटत आहेत. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सारे विश्वस्त, गार्डीअन मीडिया अँड एंटरटेनमेंटचे सारे विशेषज्ञ-तंत्रज्ञ आदी सारे रात्रीचा दिवस एक करत आहेत. या साऱ्यांच्या परिश्रमाचे प्रतिबिंब आपल्याला या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्यात नक्की पाहायला मिळेल. बाबासाहेबांना त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वाहिलेली हीच योग्य श्रद्धांजली असेल.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरे