शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

३०० वाहनांचा ताफा, हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी; CM केसीआर घेणार पांडुरंगाचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 19:28 IST

येत्या २७ जून रोजी तेलंगणाचे सर्व मंत्रिमंडळ घेऊन मुख्यमंत्री केसीआर हे पंढरपुरच्या पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत.

पंढरपूर - राज्याच्या राजकारणात भारत राष्ट्र समिती वेगाने पुढे येत आहे. अनेक पक्षाचे मातब्बर नेते, माजी आमदार यांची बीआरएसमध्ये प्रवेश देत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. सुरुवातीला मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत केलेल्या केसीआर यांनी आता हळूहळू राज्याच्या विविध कोपऱ्यात पाय रोवण्याची तयारी केली आहे. त्यात पंढरपूर आषाढी वारीनिमित्त केसीआर जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जातेय. 

येत्या २७ जून रोजी तेलंगणाचे सर्व मंत्रिमंडळ घेऊन मुख्यमंत्री केसीआर हे पंढरपुरच्या पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. अब की बार किसान सरकार हा नारा देत केसीआर यांनी राज्यातील शेतकऱ्यांना हाक दिली आहे. पंढरपुरात मोठ्या संख्येने वारकरी आषाढी वारीनिमित्त एकत्र येतात. याच संधीचा फायदा घेत केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीने पंढरपुरात शक्तीप्रदर्शन करण्याचं ठरवले आहे. तब्बल ३०० वाहनांचा ताफा घेऊन केसीआर पंढरपुरात दाखल होतील. त्यानंतर त्यांच्याकडून माऊली ज्ञानोबा, संत तुकाराम महाराजांच्या पालखीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. 

BRS काँग्रेसला त्रास देण्यासाठी महाराष्ट्रात - राष्ट्रवादीकुठल्याही परिस्थितीत केसीआर यांना काँग्रेसला त्रास द्यायचा आहे. तेलंगणात काँग्रेस आणि केसीआर यांच्यात जोरदार लढाई सुरू आहे. तेलंगणाचा वचपा मी महाराष्ट्रात काढेन या भावनेतून बीआरएस राज्यात येतेय. त्यांचा कुठलाही ग्राऊंड नाही. बीआरएसला फार काही मते मिळतील असं मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तर BRS चे स्वागत केले पाहिजे. एकीकडे आघाडीकडून वारकऱ्यांवर टीका केली जाते. या लोकांनी दखल घेतली नाही परंतु BRS ने कमीत कमी दखल घेतली. निश्चितच काँग्रेस राष्ट्रवादीला बीआरएसचा फटका बसणार आहे असं शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं.

दरम्यान, पंढरपूरला सगळ्यांचे स्वागत आहे. फक्त राजकारणासाठी कुणीही येऊ नये. भक्तीभावाने त्याठिकाणी आले पाहिजे. भक्तीभावाने कुणी येत असेल तर त्याठिकाणी त्यांचे स्वागत आहे असं प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसीआर यांच्या पंढरपूर दौऱ्यावर दिली आहे. 

 

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेस