शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Omicron Variant: अरे बापरे! महाराष्ट्रात धडकला ओमायक्रॉन; लोकांनी घाबरु नये, सरकारचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 06:45 IST

डोंबिवलीतील ३३ वर्षीय तरुणाला संसर्ग; गुजरातच्या जामनगर येथे एका ७२ वर्षीय पुरुषाला हा संसर्ग झाला. ओमायक्राॅनचा संसर्ग झालेल्यांची संख्या आता देशात चार झाली आहे.

मुंबई : कर्नाटक आणि गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही काेराेनाच्या ओमायक्राॅन व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. मुंबईजवळच्या डाेंबिवली येथील ३३ वर्षीय तरुणाला ओमायक्राॅनचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. या रूग्णाला सौम्य लक्षणे असून जनतेने घाबरुन जावू नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

गुजरातच्या जामनगर येथे एका ७२ वर्षीय पुरुषाला हा संसर्ग झाला. ओमायक्राॅनचा संसर्ग झालेल्यांची संख्या आता देशात चार झाली आहे. डाेंबिवलीत आढळलेला रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून दुबई आणि दिल्लीमार्गे २३ नाेव्हेंबरला मुंबईत दाखल झाला. आराेग्य संचालिका डाॅ. अर्चना पाटील यांनी सांगितले, की हा रुग्ण चारजणांसाेबत मुंबईत दाखल झाला. त्यांचा शाेध सुरु आहे. हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये आहे. एप्रिलपासून जहाजावर असल्याने त्याला लस घेता आली नव्हती.  भारतात परततानाच त्याला ओमायक्राॅनचा संसर्ग झाल्याची माहिती कल्याण-डाेंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, झांबिया येथून पुण्यात दाखल झालेल्या ६० वर्षीय पुरुषाचा जनुकीय चाचणी अहवाल प्राप्त झाला असून, त्यांना ओमायक्राॅनचा संसर्ग झालेला नाही, असे स्पष्ट झाले आहे.

बूस्टर डाेस गरजेचासंसर्गक्षमता खूप जास्त असल्याने  काेराेनाचा ओमायक्राॅन व्हेरिएंट डेल्टाची जागा घेऊ शकताे. येणाऱ्या काळात ओमायक्राॅनचेच रुग्ण माेठ्या प्रमाणात आढळतील. मात्र, वेगळ्या लसीची कदाचित गरज भासणार नाही, असे जागतिक आराेग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डाॅ. साैम्या स्वामिनाथन यांनी सांगितले. डाॅ. स्वामिनाथन म्हणाल्या की, नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेतून उगम पावला, याबाबतही शंकेला वाव आहे. यापूर्वी काेराेना संसर्गामुळे निर्माण झालेल्या राेगप्रतिकारशक्तीला ओमायक्राॅन चकवू शकताे. मात्र, लसी त्याच्याविरुद्ध प्रभावी ठरत असल्याचे आतापर्यंतच्या संसर्गावरून आढळले आहे. संसर्ग झालेल्यांना गंभीर आजार हाेत नाही. कदाचित बूस्टर डाेसची गरज भासू शकते, असे त्या म्हणाल्या. 

गुजरातच्या जामनगरमध्ये आणखी एक बाधित गुजरातमध्ये संसर्ग झालेला नागरिक झिम्बाब्वे येथून भारतात परतला हाेता. विमानतळावर तपासणीदरम्यान त्याला काेराेना झाल्याचे आढळून आले. त्यानंतर अहमदाबाद येथे जिनाेम सिक्वेन्सिंग करण्यात आले. त्यातून ओमायक्राॅनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची ओळख पटविण्यात येत आहे. यापूर्वी कर्नाटकमध्ये ६६ आणि ४६ वर्षांच्या दाेन रुग्णांना ओमायक्राॅनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले हाेते. दाेघांचेही संपूर्ण लसीकरण झाले हाेते, हे विशेष.

पाच वर्षांखालील मुलांनाही संसर्ग हा विषाणू यावेळी लहान मुलांनाही कवेत घेत असल्याचे दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेत तिसऱ्या लाटेत १५ ते १९ वर्षांच्या तरुणांमध्ये संसर्ग होता. मात्र, यावेळी पाच वर्षांखालील मुले व ६० वर्षांवरील ज्येष्ठांची रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून आले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनRajesh Topeराजेश टोपे