हर्षनंदन वाघ / बुलडाणावृद्ध कलावंतांना शासनातर्फे देण्यात येणारे मानधन आता ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून मिळणार असून, मानधनाची रक्कम थेट कलावंतांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागाकडून कलाकारांची माहिती गोळा करण्यात येत आहे.राज्यात शासनातर्फे वृद्ध कलावंत, साहित्यिक मानधन योजना १९५४-५५ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे वृद्ध कलावंत, साहित्यिकांना मोठा आधार मिळाला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कालानुरूप अनेक सुधारणा करण्यात आल्या असून, मानधनाच्या रकमेत वाढही करण्यात आली आहे. सध्या शासनाकडून ह्यअह्ण वर्ग वृद्ध कलावंत व साहित्यिकांना दरमहा १,४00 रुपये, ह्यबह्ण वर्ग कलावंत व साहित्यिकांना दरमहा १,२00 रुपये, तर ह्यकह्ण वर्ग कलावंत व साहित्यिकांना दरमहा १ हजार रुपये मानधन देण्यात येते. मानधन मिळविण्यासाठी आतापर्यंत वृद्ध कलावंत व साहित्यिकांना जिल्हा परिषदेत हेलपाटे घ्यावे लागत होते; परंतु यापुढे त्यांना मानधन ऑनलाईन प्रणालीद्वारा मिळणार आहे. यासाठी लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याचे आदेश, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहसंचालकांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिले आहेत. शासनाने उचललेल्या या पावलामुळे वृद्ध कलावंतांना मानधन मिळविण्यासाठी होणारा त्रास बंद होणार आहे.*असे मिळणार ऑनलाईन मानधनवृद्ध कलावंत व साहित्यिकांनी मानधनासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर केल्यानंतर, जिल्हा परिषदेचा अर्थ व नियोजन विभाग आणि जिल्हा कोषागार कार्यालयाकडून त्याला मंजुरी मिळेल. मानधनाची रक्कम पंचायत समिती कार्यालयाकडे जमा झाल्यानंतर, संबंधित कलावंतांच्या बँक खात्यात जमा होईल. जिल्हा परिषदेने वृद्ध कलावंतांची यादी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या ह्यई-मेल आयडीह्णवर पाठविल्यानंतर, यादीला मंजुरी मिळाल्यास तत्काळ मानधन संबंधित वृद्ध कलावंतांच्या बँक खात्यात जमा होईल.
वृद्ध कलावंत-साहित्यिकांचे मानधन आता ऑनलाईन!
By admin | Updated: July 17, 2014 00:42 IST