शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात चोरीसाठी वृद्धेचा खून, एकाला अटक

By admin | Updated: July 20, 2016 19:48 IST

उल्हासनगर येथील एका वृद्धेकडे चोरी करण्यासाठी तिचा गळा दाबून निर्घृण खून करणाऱ्या सुनिल सुदाम कनोजे (३८) याच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 20 -  उल्हासनगर येथील एका वृद्धेकडे चोरी करण्यासाठी तिचा गळा दाबून निर्घृण खून करणाऱ्या सुनिल सुदाम कनोजे (३८) याच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून त्या वृद्धेकडून हिसकावलेल्या दोन सोन्याच्या बांगडयाही हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.उल्हासनगर रेल्वे स्थानक रोडवरील ढोली नाश्तावाला या हॉटेलसमोरील एकटयाच राहणाऱ्या वीणा रामनानी (६३) यांच्याकडे पाणी मागण्याच्या बहाण्याने सुनिल या फिरस्त्याने ४ जुलै रोजी शिरकाव केला होता. त्यानंतर त्यांचे दागिने हिसकावण्यासाठी त्याने हत्या केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे खंडणी विरोधी पथक, मध्यवर्ती शोध पथक तसेच युनिट चारचे उल्हासनगर अशा तीन पथकांसह उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पथकही या गुन्हयाचा समांतर तपास करीत होते. मणेरे यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त नागेश लोहार, मुकूंद हतोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोणताही धागादोरा नसतांना तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे युनिट चारचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे, अजय कांबळे आदींच्या पथकाने १६ दिवसांतच या प्रकरणाचा छडा लावला. पूर्वी वीणा यांच्या मुलाच्या अगरबत्तीच्या दुकानात सुनिल हा नोकरीला होता. तो गेल्या काही दिवसांपासून त्या परिसरातून अचानक बेपत्ता असल्याचीही माहितीही या पथकाला मिळाली. त्यानुसार उल्हासनगर, कल्याण ते पनवेल, कर्जत, खोपोली, नाशिक, पुणे आदी ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला. याच दरम्यान, तो उल्हासनगर येथील अशोक टॉकीज परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला २० जुलै रोजी दुपारी १ वा. च्या सुमारास सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन तोळयाच्या सोन्याच्या दोन बांगडयाही हस्तगत करण्यात आल्या आहेत. जबरी चोरीच्या उद्देशानेच या वृद्धेची हत्या केल्याची कबूलीही त्याने पोलिसांना दिली. वृद्धेचा खून केल्यानंतर तिच्या हातातून या सोन्याच्या बांगडया काढून घेतल्याचे त्याने चौकशीत पोलिसांना सांगितले. त्याला शोधण्यासाठी अनेक रेल्वे तसेच बस स्थानके, चित्रपटगृह, दारुचे गुत्ते धर्मशाळेत रात्रीच्या वेळी राहणाऱ्या लोकांकडे अशा अनेक ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला होता. त्याने आणखी काही प्रकार केले आहेत का? याचाही शोध घेण्यात येत असल्याचे मणेरे यांनी सांगितले.