शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल ५ तास वाहतुकीसाठी राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 13:28 IST

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवार १९ सप्टेंबर रोजी तपासणीसाठी सकाळी ५ तास बंद ठेवला जाणार आहे.

ठळक मुद्दे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवार १९ सप्टेंबर रोजी तपासणीसाठी सकाळी ५ तास बंद ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूची वाहतूक नविन पुलावरुन होणार असली तरी वाहतुकीची मोठी कोंडी होणार असल्याने नागरिकांनी या मार्गावरुन वाहनप्रवास टाळावा असे आवाहन केलं आहे.

- धीरज परबमीरारोड/ठाणे, दि. 16- मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवार १९ सप्टेंबर रोजी तपासणीसाठी सकाळी ५ तास बंद ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूची वाहतूक नविन पुलावरुन होणार असली तरी वाहतुकीची मोठी कोंडी होणार असल्याने नागरिकांनी या मार्गावरुन वाहनप्रवास टाळावा असे आवाहन महामार्ग प्राधिकरण व वाहतुक पोलिसांनी केले आहे. मुंबईला जोडणारा वसई खाडीवरील जुना वरसावे पूल हा गेल्या वर्षी सप्टेंबरपासून गर्डरला तडा गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. कुठल्या पध्दतीने त्याची दुरुस्ती करायची यावर मोठा काथ्याकुट झाल्यावर अखेर उच्चप्रतीच्या लोखंडी फ्रेम (ट्रस ) चा आधार देऊन दुरुस्ती करण्यात आली. पूल बंद असल्याचा काळात नविन पुलावरुनच दोन्ही बाजुची वाहतुक सुरु होती. परंतु या मुळे काही तास वाहतुक कोंडीत लोकांना घालवावे लागत होते. ९ महिन्यांपासून बंद असलेला हा पूल अखेर मे मध्ये सुरु करण्यात आला.

सध्या जुना पुलावरुन एका मार्गिकेतुन लहान तर एका मार्गिकेतुन मोठी वाहनं सोडली जात आहेत. तसे असले तरी पुलाची नियमीत तपासणी करणे गरजेचे बनले आहे. कारण महाड पूल दुर्घटने नंतर शासकीय यंत्रणा कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाही. शिवाय जुन्या पुलावरुन सातत्याने वाहनांची वर्दळ सुरु असते. नियमीत तपासणी मध्ये पुलाची वजन झेलण्याची क्षमता, तडा गेलेल्या गर्डरची स्थिती दुरुस्ती केलेल्या ट्रसची तपासणी केली जाणार असल्याचे प्राधिकरणाच्या सुत्रांनी सांगीतले. अशा प्रकारची तपासणी ही दर तीन ते चार महिन्यांनी केली जाणार आहे.

मंगळवारीदेखील सकाळी ८ वाजल्यापासून तपासणीसाठी जुना पूल वाहतुकीकरीता बंद ठेवला जाणार आहे. सदर तपासणीचे काम सुमारे ५ तास चालणार आहे. त्यामुळे जुन्या पुलावरुन वसई - गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतुक नविन पुलावरुन वळवली जाणार आहे. जेणे करुन वाहतुकीची मोठी कोंडी होणार असल्याने पोलिस व वाहतुक पोलिसांसह प्राधिकरणदेखील तयारीला लागले आहे.वाहतुकीच्या नियोजनासाठी मीरा भार्इंदर वाहतुक शाखेचे १८ ; पालघर शाखेचे २२ तर महामार्ग वाहतुक शाखेचे ११ असे मिळुन ५१ अधिकारी व कर्मचारी तैनात केले जाणार आहे. शिवाय पालिकेच्य वतीने ट्रॅफिक वॉर्डन सुध्दा दिले जाणार आहेत. 

अवजड व मोठी वाहनं भिवंडी - चिंचोटी मार्गे वळविण्याचे सांगण्यात आले आहे. दर वीस मिनीटांनी नविन पुलावरुन एका एका बाजुची वाहनं सोडली जाणार आहेत.जगदिश शिंदे, निरीक्षक, वाहतूक पोलीस