शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वृद्ध असुरक्षित, धक्कादायक वास्तव; २१,४१० गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:32 IST

महाराष्ट्रात वृद्ध नागरिक सर्वाधिक असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही स्थिती कायम आहे. एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण राज्यात वृद्धांची फसवणूक, हत्या असे

मुंबई : महाराष्ट्रात वृद्ध नागरिक सर्वाधिक असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही स्थिती कायम आहे. एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण राज्यात वृद्धांची फसवणूक, हत्या असे २१,४१० गुन्हे दाखल झाले. २०१४च्या तुलनेत हा आकडा २,६९३ने वाढला आहे. त्यापैकी ४,६९४ गुन्हे एकट्या महाराष्ट्रात दाखल आहेत.आकडेवारीतली धक्कादायक बाब म्हणजे ज्येष्ठांच्या सर्वाधिक हत्याही महाराष्ट्रातच घडल्या आहेत. यामध्ये १६९ वृद्धांची हत्या झाली तर ६७ वृद्धांच्या हत्येचा प्रयत्न झाला. चार वृद्ध महिलांवर बलात्कार करण्यात आला. ८०० फसवणुकीचे बळी ठरले. महाराष्ट्रातील वृद्धांच्या घरात सर्वाधिक दरोडे घालण्यात आलेले आहेत. राज्यात असे २४ दरोडे पडले आहेत. देशात ही संख्या ३९ आहे. त्यामुळे वद्धांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.अशाही दु:खद घटना...फोर्ट परिसरात राहणारे फ्रान्सिस झेवियर्स कुटिन्हो यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत चार दिवसांनंतर घरातून बाहेर काढला. त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अमेरिकेत स्थायिक झालेल्या पत्नी आणि मुलाकडे त्यांची भाची सांचा डिकोस्टाने संपर्क साधला.मात्र अंत्यसंस्कारासाठीही वेळ नसल्याचे सांगून मुलाने येण्यास नकार दिला. यापूर्वी ८ आॅगस्टला लोखंडवाला परिसरात घडलेल्या घटनेने तर सर्वांनाच सुन्न केले. ओशिवरा परिसरात आशा साहानी कुटुंबीयांसोबत राहायच्या.२० वर्षांपूर्वी मुलगा रुतुराज अमेरिकेला स्थायिक झाला. त्यानंतर पतीच्या आधारावर त्या जगत होत्या. २०१३मध्ये पतीचे निधन झाले आणि त्या एकट्या पडल्या. त्यानंतर एकदाच मुलाने आईसोबत संपर्क साधला. १६ महिन्यांनी तो घरी परतला तेव्हा बंद घरातून आईचा सांगाडा त्याच्या हाती लागला. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र