शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘जुनी पेन्शन’ लागू करता येणार नाही : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 07:41 IST

दूरगामी आर्थिक परिणामांचा विचार करता राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना पूर्ववत लागू करता येणार नाही.

मुंबई : दूरगामी आर्थिक परिणामांचा विचार करता राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना पूर्ववत लागू करता येणार नाही. त्याने आर्थिक दरी निर्माण होण्याचा धोका असल्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत स्पष्ट केले.भाजपचे अनिल सोले यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा तारांकित प्रश्न मांडला होता. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही. जुन्या पेन्शन योजना बंद करण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने विचारांती घेतला आहे. राज्य सरकारनेही तोच निर्णय लागू केला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.केंद्र सरकारकडून मिळणारे समांतर अनुदान, राज्य सरकारचे उत्पन्न आणि कर्ज असे एकूण चार लाख कोटी रुपये राज्याच्या तिजोरीत येतात. राज्यातील साडेपाच लाख सरकारी कर्मचारी, नऊ लाख अनुदानित संस्थांच्या कर्मचा-यांचे वेतन, साडेसात लाख जुने निवृत्तीवेतन धारक त्याचप्रमाणे नव्या दोन लाख निवृत्तीवेतन धारकांचे वेतन मिळून एकूण वार्षिक एक लाख ५१ हजार कोटी रुपयांचा भार राज्य सरकारवर आहे. यात २००५ पूर्वीच्या सेवानिवृत्त कर्मचाºयांचाच भार ३६ हजार २६८ कोटींचा आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार