शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

स्मरणशक्ती कमजोर असलेली वृद्ध व्यक्ती सुखरूप घरी पोहोचली!

By admin | Updated: July 5, 2017 04:29 IST

संवेदनशील वृत्ती असेल तर एखाद्याचे दुरावलेले कुटुंब परत मिळू शकते, याची प्रचिती अकोला जिल्ह्यातील पातूरच्या उमेश अमानकर यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संवेदनशील वृत्ती असेल तर एखाद्याचे दुरावलेले कुटुंब परत मिळू शकते, याची प्रचिती अकोला जिल्ह्यातील पातूरच्या उमेश अमानकर यांच्या बांधीलकीतून दिसून आली आहे़ त्यांच्यामुळे स्मरणशक्ती कमजोर असलेल्या ७८ वर्षीय रामबाबू मंगल यांची दक्षिण भारत भ्रमंती अखेर घरी येऊन थांबली़कल्याण येथील मंगल परिवार आग्रा ते हैद्राबाद रेल्वेने प्रवास करीत होता़ त्यांच्या समवेत घरातील ७८ वर्षीय रामबाबू मंगलही होते़ त्यांची स्मरणशक्ती कमजोर होती़ दरम्यान, २७ जून रोजी दुपारी २ वाजता भोपाळ रेल्वे स्टेशनवर रामबाबू उतरले़ घरच्यांना त्याची खबर नव्हती़ २८ जून रोजी भोपाळच्या रेल्वे स्टेशनवरील सीसी कॅमेरामध्ये ते दिसले़ त्यानंतर त्यांचा पत्ता लागला नाही़ पुढे काय आणि कसे घडले, याची कोणालाही खबर नाही़; मात्र चार दिवसांनंतर रामबाबू थेट अकोला जिल्ह्यातील पातूर गावी पोहोचले़ तेथे ते एका रिक्षात बसले़ त्यांनी माझ्या मुलीचे कृषी सेवा केंद्र आहे, तेथे नेऊन सोडा, असे सांगितले़ रिक्षा चालकाने अख्खे पातूर दाखविले. त्यांनी कृषी सेवा केंद्र ओळखले नाही़ शेवटी रिक्षाचालक उमेश अमानकर यांना ओळखत होता़ त्यांचे रेणुका सेवा केंद्र आहे़ तिथे पोेहोचल्यावर रामबाबूंनी हेच माझ्या मुलीचे कृषी सेवा केंद्र आहे, असे सांगितले़ त्यावेळी अमानकर रिक्षाजवळ आले़ त्यांनी रामबाबूंना पाहिले; परंतु ते नातेवाईक नाहीत, याची खात्री पटली़ त्यांनी विचारपूस केली़ तुम्हाला कोठे जायचे आहे़ ते म्हणाले मी हैद्राबादमध्ये आलो आहे़ हे माझ्या मुलीचे दुकान आहे़ आधी मला घरी सोडा़ पुन्हा मी दुकानात येतो़ त्यांच्या संवादावरून अमानकर यांना त्यांच्या स्मरणशक्तीविषयी जाणीव झाली़ त्यांनी त्यांच्या खिशातून अलगदपणे ओळखपत्र व डायरी काढली़ त्या डायरीवरून संपर्क साधला़ तेव्हा मंगल परिवारातील सदस्यांनी रामबाबूंना तेथेच सांभाळावे़ काही तासात अकोल्यातील त्यांचे परिचीत येतील, हे सांगितले़; मात्र रामबाबू रिक्षाच्या खाली उतरत नव्हते़ त्यामुळे उमेश यांनी रामबाबूंना घरी पाठवतो, असे सांगून अक्षरश: दोन अडीच तास रिक्षातून फिरवत गुंतवून ठेवले़; दरम्यान हैद्राबाद मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकावर पोलिसांनी तपासणी केली होती़ नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनीही त्या मार्गावरील सर्व पोलीस ठाण्यांना संपर्क केला होता़ तद्नंतर त्यांनी अमानकर यांच्याशी संवाद साधून सहकार्य करण्याचे आवाहन केले़ नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनीही या तपास मोहिमेत मंगल परिवाराला सहकार्य केले़ ते म्हणाले की, अकोला जिल्ह्यातील उमेश अमानकर यांच्या सतर्कतेमुळे रामबाबूसारखे स्मरणशक्ती कमजोर असलेले व्यक्ती कुटुंबियांना परत मिळू शकले़ हीच सामाजिक जाणीव ठेवली तर अनेक कुटुंबातील दुरावलेले सदस्य आपापल्या घरी पोहोचू शकतात़ आम्ही पोलीस दलाच्या वतीने अमानकर यांना सन्मानित करणार आहोत़