शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकांमध्ये जुन्या नोटांची थप्पी

By admin | Updated: May 15, 2017 00:38 IST

सहा महिन्यांपासून पाच हजार कोटी पडून :दरमहा ४८ कोटी रुपये व्याजाचा फटका

राजाराम लोंढे ।  लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रिझर्व्ह बॅँकेने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सहा महिने उलटले तरी राज्यातील ३१ जिल्हा बॅँकांत अक्षरश: त्यांची थप्पी लागली आहे. बॅँकांमध्ये सुमारे ५००० कोटी रुपये पडून राहिल्याने त्याचा थेट परिणाम आर्थिक ताळेबंदावर झाला आहे. ‘नाबार्ड’ने तीनवेळा तपासणी करूनही रिझर्व्ह बॅँक नोटा स्वीकारण्यास तयार नसल्याने राज्यातील जिल्हा बॅँकांना दरमहा ४८ कोटी रुपये व्याजाचा फटका बसत आहे. रिझर्व्ह बॅँकेने ८ नोव्हेंबरला ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या. सुरुवातीला नोटा स्वीकारण्यास जिल्हा बॅँकांना परवानगी दिली होती. या काळात सुमारे ५००० कोटी रुपये जिल्हा बॅँकांत जुन्या नोटांच्या स्वरूपात जमा झाले. मात्र रिझर्व्ह बँकेने नवे चलन संबंधित बॅँकांना दिले नाही. बँकांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात ५०० व १००० रुपयांच्या नोटा आल्या कोठून, असा प्रश्न नाबार्ड व रिझर्व्ह बॅँकेने उपस्थित केला. त्यामुळे संबंधित खात्यांची ‘नाबार्ड’ने ‘केवायसी’ पूर्तता तपासली. काही ठिकाणी नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी चौथी तपासणीही केली. तरीही या नोटा बॅँकांत पडून आहेत. मार्च २०१७ अखेर प्रत्येक जिल्हा बॅँकेला सरासरी १० ते १५ कोटींचा फटका बसल्याने ताळेबंद कोलमडला आहे. सर्व बॅँकांची ‘केवायसी’ तपासणी पूर्ण झाली आहे. आठ-दहा दिवसांत रिझर्व्ह बॅँक जुने चलन घेण्याची शक्यता आहे. सहा महिने झाले तरी चलन तुटवडा जिल्हा बॅँकांची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. एकूण गरजेच्या पाच ते १० टक्के चलन पुरवठा रोज या बॅँकांना करन्सी चेस्टकडून होतो. त्यामुळे अद्यापही व्यवहार अडखळतच सुरू आहेत.या चार बँकांत सर्वाधिक रक्कमनोटाबंदीच्या काळात जिल्हा बॅँकांत ५०० व १००० रुपयांच्या सर्वाधिक नोटा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जमा झाल्या. नाशिक, सांगलीपाठोपाठ कोल्हापूर जिल्हा बॅँकेतही मोठी रक्कम जमा झाली. ‘केवायसी’ची कागदपत्रे तपासणीने जीर्ण ‘केवायसी’च्या पूर्तता कागदपत्रांची जिल्हा बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी एकदा आणि ‘नाबार्ड’ने तब्बल तीन वेळा तपासणी केली. चार तपासण्यांमुळे ही कागदपत्रे जीर्ण होण्याची वेळ आली तरी रिझर्व्ह बॅँक व नाबार्डची खात्री झालेली दिसत नाही.पाठपुरावा सुरूच : कर्नाडयाबाबत राज्य सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक प्रमोद कर्नाड म्हणाले, सहा महिने झाले राज्यातील जिल्हा बॅँकांमध्ये ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून सुमारे ५००० कोटी रुपये पडून आहेत. याबाबत शिखर बॅँक म्हणून आम्ही रिझर्व्ह बॅँकेकडे पत्रव्यवहार केला आहे. केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विनंती केली आहे. शुक्रवारी सोळा जिल्हा बॅँकांच्या बैठकीतही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमोर प्रतिनिधींनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.