-महेश घोराळे, मुंबई मोबाइल, टॅबलेट, संगणकाच्या पडद्यामागे जग धावत असताना, डोळ्यांवर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. स्क्रीनच्या अतिवापरामुळे मायोपियासारखे (दूरचे धूसर दिसणे) आजार उद्भवत असून, जगातील ३०% लोक सध्या या दृष्टीदोषाने ग्रस्त आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२०५० पर्यंत जगातील सुमारे ५०% लोकांना हा त्रास सहन करावा लागू शकतो, असा इंटरनॅशनल मायोपिया इन्स्टिट्यूटचा इशारा आहे. अशातच पाच वर्षांपेक्षा लहान मुलांकडून होणाऱ्या मोबाइलच्या अतिरेकी वापराबाबत नेत्ररोग तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
जगभरात दृष्टीदोषामुळे तब्बल २.२ अब्ज लोक बाधित असून, यातील अनेक जण योग्य उपचारांपासून वंचित आहेत.
डिजिटल आय स्ट्रेनचे हे आहेत पाच परिणाम
डोळ्यांत जळजळ - सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांतील ओलावा कमी होतो. डोळे कोरडे होतात.
डोकेदुखी - डोळ्यांवर ताण आल्याने.
धुसर दिसणे - डोळे योग्य प्रकारे फोकस करू शकत नाहीत.
झोप न येणे - स्क्रीनमधील ब्लू लाइटचा परिणाम, मेलाटोनिन हार्मोन निर्मिती कमी होते.
डोळ्यांत थकवा - पापणी कमी लवते, त्यामुळे डोळे कोरडे होतात.
लहान वयात मुले दीर्घकाळ मोबाइल
'स्क्रीनच्या संपर्कात येणे हे त्यांच्या नेत्रआरोग्यासाठी घातक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर याविषयी चिंता व्यक्त होतअसल्याने स्क्रीन टाइमवर मर्यादा घालण्यासाठी वेळीच सजग होण्याची गरज आहे', असे अकोल्यातील शासकीय रुग्णालयातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. भावेश गुरूदासानी यांनी सांगितले.