शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एक अधिकारी, एक घर योजनेसाठी नियमात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 06:06 IST

एक अधिकारी, एक घर, एक राज्य या नियमानुसार सरकारी योजनेतून निवासस्थान देण्यासाठी नियमात बदल करण्यास राज्य सरकार तयार असल्याची माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.

मुंबई -  एक अधिकारी, एक घर, एक राज्य या नियमानुसार सरकारी योजनेतून निवासस्थान देण्यासाठी नियमात बदल करण्यास राज्य सरकार तयार असल्याची माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.सनदी अधिकारी व न्यायाधीशांना संपूर्ण राज्यात सरकारी योजनेतून केवळ एक घर देण्यासाठी धोरण बनविण्यासंदर्भात राज्य सरकार तयार आहे, अशी माहिती आशुतोष कुंभकोणी यांनी न्या. भूषण गवई व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाला दिली.राज्य सरकारने यासंदर्भात धोरण करण्याची तयारी दर्शविल्याबद्दल उच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले. सरकारी अधिकाऱ्यांनी मग ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असले तरीही त्यांनी पदाचा गैरवापर करू नये. सरकारी योजनेतून एकापेक्षा अधिक घरे घेण्याचा अधिकार कोणालाही नसावा, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांसाठी ओशिवरा येथे उंच इमारत बांधण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. विद्यमान न्यायाधीशांसह मुंबई उच्च न्यायालयातून बढती होऊन सर्वोच्च न्यायालयात गेलेले न्यायाधीश व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मोहित शहा व मंजुळा चेल्लूर यांनाही प्रस्तावित सोसायटीमध्ये सदनिका देण्यात येणार असल्याची माहिती तिरोडकर यांनी न्यायालयाला दिली. राज्य सरकारने ३९ विद्यमान न्यायाधीशांना सोसायटीचे सदस्यत्व दिले आहे. मात्र त्यापैकी दोन न्यायाधीशांनी सदस्यत्व मागे घेतले आहे....तर नियम लागू होऊ शकत नाहीसनदी अधिकारी किंवा न्यायाधीशांना सरकारी योजनेतून आधीच घर मिळाले असले तर त्यांना त्याच शहरात किंवा त्याच राज्यातील अन्य शहरात सरकारी योजनेतून घर घेण्याचा अधिकार नाही, असे न्यायालयाने सांगितले.त्यावर कुंभकोणी म्हणाले की, एखाद्या अधिकाºयाची किंवा न्यायाधीशाची राज्यातील अन्य शहरात बदली झाली आणि ते राहत असलेले सरकारी योजनेतील घर सरकारला परत केले तर बदली झालेल्या ठिकाणी त्यांना पुन्हा सरकारी योजनेतून घर मिळू शकेल.मात्र त्या व्यक्तीने संबंधित घर विकले किंवा नातेवाईकाच्या नावावर हस्तांतरित केले तर त्याला हा नियम लागू होऊ शकत नाही, असेही कुंभकोणी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Homeघरnewsबातम्या