शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
5
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
6
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
7
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
8
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
9
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
10
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
11
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
12
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
13
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
14
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
15
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार
16
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
17
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
18
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
19
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
20
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

अधिकारी, कर्मचारी फैलावर

By admin | Updated: November 4, 2016 02:28 IST

हागणदारीमुक्तीच्या ९७ हजार ३९८ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला दिवसाला ६४९ शौचालये बांधावी लागणार आहेत

आविष्कार देसाई,

अलिबाग- हागणदारीमुक्तीच्या ९७ हजार ३९८ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला दिवसाला ६४९ शौचालये बांधावी लागणार आहेत, तर महिन्याला १९ हजार ४८० शौचालये उभारण्याचे कठीण काम करावे लागणार आहे. पुढील पाच महिन्यांचे नियोजन करून दस्तुरखद्द मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी कमी काम करणाऱ्या तालुक्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. अधिकारी, कर्मचारी यांना फैलावर घेत त्यांना कामाला लावले आहे. जिल्ह्याला अग्रस्थानी न्यायचे असेल, तर तालुक्यांनी आळस झटकून कामाला लागण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा कोकण विभागाचे अग्रस्थान डळमळीत होऊन आळशीपणाचे खापर रायगडकरांवर फुटण्याची शक्यता आहे. भारतातील हागणदारीमुक्त जिल्हा होण्याचा मान कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याने मिळवला आहे. ३१ मार्चअखेर कोकण विभागाने हागणदारीमुक्तीमध्ये अग्रस्थानी राहावे, असे आवाहन मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. सिंधुदुर्गपाठोपाठ रत्नागिरी, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याचे काम त्या दिशेने सुरु आहे. रायगड आणि पालघर यांच्या टार्गेटमध्ये विशेष फरक नसल्याने दोन्ही जिल्ह्यांना जोर लावून काम करावे लागणार आहे. रायगड जिल्ह्याला ३१ मार्च २०१७ अखेर ९७ हजार ३९८ शौचालये बांधावी लागणार आहेत. त्यानुसार महिन्याला १९ हजार ४८०, तर दर दिवसाला ६४९ शौचालयांची निर्मिती करायची आहे. ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत म्हसळा, श्रीवर्धन, तळा आणि पोलादपूर या तालुक्यांना अनुक्रमे २७६, ९२६,९८९, १२५० शौचालये उभारावी लागणार आहेत.२६ जानेवारी २०१७ पर्यंत उरण २५९७, महाड ६१३८, मुरुड ४१०२ शौचालये बांधावी लागणार आहेत. १९ फेब्रुवारी २०१७ पर्यंत पनवेल ११०१५, माणगाव ९०३०, खालापूर ७४७६, रोहा ९०२३ तर, ३१ मार्च २०१७ अखेर अलिबाग ११४२१, पेण ११४११, कर्जत १४४५६, सुधागड ७२८८ शौचालये बांधावी लागणार आहेत.रायगड जिल्ह्याने आघाडी घ्यावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. >अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठकारायगड जिल्ह्याने आघाडी घ्यावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. त्यांनी या सर्व तालुक्यांना आपल्या रडारवर घेतले आहे. काम कमी असणाऱ्या तालुक्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनी त्यांना कामाला लावले असल्याचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यामुळे निश्चितच रायगड हागणदारीमुक्त होण्यास उपयोग होणार आहे.>टार्गेट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मदत कमी कामाच्या ठिकाणी घेतली जाणार आहे. राजकीय सहभागाबरोबरच जनसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यावरही लक्ष केंद्रित करून नियोजित वेळेत लक्ष्य पूर्ण करण्यात येईल.- राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी