शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार किमीचा प्रवास, तीन राज्ये ओलांडून विदर्भात आले ओडिशाचे हत्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 05:38 IST

पूर्व विदर्भात बस्तान मांडण्याची शक्यता : जंगल, तलावासोबत धानपिकाचेही आकर्षण

मनोज ताजने 

गडचिरोली - तब्बल दोन हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करीत पूर्व विदर्भाच्या जंगलात वर्षभरापासून रेंगाळत असलेले ओडिशाच्या जंगलातील हत्ती येथून काढता पाय घ्यायला तयार नाहीत. तब्बल २३ लहान-मोठ्या हत्तींचा हा कळप पोषक वातावरणामुळे पूर्व विदर्भात स्थिरावण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. भरपूर चारा आणि पाणी (तलाव) असलेल्या भागात या हत्तींचा मुक्काम असतो. दिवसा जंगलात आराम करणे आणि रात्रीच्या अंधारात चरण्यासाठी बाहेर पडणे असा त्यांचा उपक्रम आहे. धानपिकाची चटक लागलेल्या या हत्तींसाठी पूर्व विदर्भाचा प्रदेश पोषक ठरत आहे. 

‘हुल्ला पार्टी’ चमूकडून मॉनिटरिंगया हत्तींवर पाळत ठेवण्यासाठी आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी गडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी पश्चिम बंगालमधील ‘सेझ’ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेला ऑगस्ट २०२२ मध्ये पाचारण केले. या संस्थेचे सहा लोक (हुल्ला पार्टी) सध्या या हत्तींवर पाळत ठेवून आहेत. हत्तींनी गावात शिरण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मशाली पेटवून रोखणे किंवा गावकऱ्यांना सतर्क करण्याचे काम ही हुल्ला पार्टी करत आहे. 

हत्तींना हुसकावणे शक्य आहे का? सामान्य नागरिकांना वाटते त्या पद्धतीने या जंगली हत्तींना हुसकावून लावता येत नाही. वनविभागाच्या नियमांतही ते बसत नाही. त्यांचा मार्ग अडविण्याचा जास्त प्रयत्न केल्यास ते आणखी आक्रमक होऊन जास्त नुकसान करू शकतात. हे हत्ती कळपाने राहत असल्यामुळे बऱ्यापैकी शांत आहेत. त्यातील काही हत्ती विखुरल्यास ते आक्रमक होऊ शकतात, असे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी सांगितले.

हत्तींना भरपूर चारा आणि पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात त्यांना दाह शांत करण्यासाठी पाण्यात बसावे लागते. पूर्व विदर्भात पोषक वातावरण असले तरी हे हत्ती किती दिवस इकडे राहतील याबद्दल निश्चितपणे सांगता येणार नाही. तूर्त नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन त्यांच्या वाटेला जाऊ नये. - डॉ. किशोर मानकर, वनसंरक्षक, गडचिरोली

ऑगस्ट महिन्यात पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या या हत्तींनी दीड महिन्यापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातून चाऱ्याचा आस्वाद घेऊन आता भंडारा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. सध्या साकोली परिसरात त्यांचे वास्तव्य आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये या हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेकडील मुरुमगाव वनपरिक्षेत्रात प्रवेश केला. कुरखेडा, देसाईगंज तालुक्यांतून वैनगंगा नदी ओलांडत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; पण तिकडे पोषक वातावरण न दिसल्याने काढता पाय घेऊन मार्च २०२२ मध्ये पुन्हा छत्तीसगड गाठले. ओडिशात ‘मयूर झरना’ हे हत्तींसाठी राखीव जंगल आहे. त्याच भागातून काही दिवस झारखंडमध्ये जाऊन हे हत्ती २०१४ मध्ये छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यात स्थिरावले होते. जवळपास सात वर्षे त्यांचे वास्तव्य छत्तीसगडच्या जंगलात होते.