शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
3
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
4
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
5
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
6
NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
7
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
8
Video: सिंहीणीने सिंहाला मारली एक 'फाईट', पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर
9
तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड
10
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक
11
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
12
VVPAT: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 'व्हीव्हीपॅट' वापरण्यास आयोगाचा नकार, कारणही सांगितलं!
13
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
14
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
15
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
16
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
17
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
18
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
19
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
20
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रसंगी बँकिंग क्षेत्रातही हस्तक्षेप करावा लागेल

By admin | Updated: January 4, 2015 02:40 IST

भारत हा एक लोकशाही देश असल्याने सामान्य माणसाचा आवाज बँकिंग क्षेत्रापर्यंत पोहोचविण्यासाठी वेळप्रसंगी राजकीय हस्तक्षेपही करावा लागेल,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूतोवाच : बँका व्यावसायिक पद्धतीनेच चालविणे गरजेचे, पण उत्तरदायित्वाची भावनाही हवीचपुणे : बॅँकिंग क्षेत्रात कोणत्याही राजकीय लुडबुडीला आपला विरोधआहे. मात्र, भारत हा एक लोकशाही देश असल्याने सामान्य माणसाचा आवाज बँकिंग क्षेत्रापर्यंत पोहोचविण्यासाठी वेळप्रसंगी राजकीय हस्तक्षेपही करावा लागेल, असे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बँका या व्यावसायिक पद्धतीनेच चालविल्या जाणे गरजेचे असले, तरी त्यांनी उत्तरदायित्वाची भावनाही जोपासायला हवी, असे पंतप्रधान म्हणाले.नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ बँक मॅनेजमेंट येथे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या ‘ज्ञानसंगम’ परिषदेत मार्गदर्शन करताना मोदी बोलत होते. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा, रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन आदी या वेळी उपस्थित होते. पंतप्रधान म्हणाले, बँकिंग क्षेत्राबाबत सरकारचे कोणतेही छुपे हितसंबंध नाहीत, हे लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपली क्षमता वाढवायला हवी. देशातील घडामोडींबाबत बॅँकिंग क्षेत्राने संवेदनशील असायला हवे. देश कोणत्या दिशेने चालला आहे, त्याकडे पाहायला हवे. सामान्य माणसासाठी बॅँकिंग अधिक सुलभ व्हावे, याकरिता प्रयत्न करायला हवेत. कर्जे देताना रोजगाराभिमुख उद्योगांना प्राधान्य द्यायला हवे. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जेही बँकांच्या प्राधान्यक्रमावर यायला हवीत. कारण ही देशासाठी उत्पादनक्षम गुंतवणूक ठरू शकते. युवकांमधील कौशल्यविकास ही देशाची गरज असून, त्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना बँकांनी करावी.बँकिंग क्षेत्राला आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले, सामाजिक उत्तरदायित्वाची जबाबदारी म्हणून बँकांनी दरवर्षी एक क्षेत्र निवडून त्यामध्ये सकारात्मक काम करण्याचाच प्रयत्न करायला हवा. स्वच्छता अभियानाचे उदाहरण घेतले, तर त्याने युवकांच्या मनात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. बँकांनी पुढाकार घेऊन २० ते २५ हजार स्वच्छता उद्योगांना मदत करायला हवी. देशामध्ये आर्थिक साक्षरता अत्यंत कमी असल्याची खंत व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले, सामान्य माणसामध्ये आर्थिक साक्षरता यावी, यासाठी बँकांनी प्रयत्न करायला हवेत. देशातील २७ राष्ट्रीय बँकांनी एकत्र यावेबँकिंग क्षेत्र हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे प्रतिबिंब असते. जपान आणि चीन या देशांच्या आर्थिक प्रगतीच्या काळात त्यांच्या बँकाही जगातील ‘टॉप टेन’ बँकांमध्ये होत्या. भारतीय बँकांनीही आपला दर्जा उंचावून जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवायला हवा. यासाठी देशातील २७ राष्ट्रीय बँकांनी एकत्र येऊन आपली बलस्थाने विकसित करायला हवीत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण लवकरच साजरा करणार आहोत. त्यादृष्टीने बँकिंग क्षेत्राने आपली उद्दिष्टे निश्चित करायला हवीत. २०२२पर्यंत ‘प्रत्येकासाठी घर’ हे आपले स्वप्न आहे. देशात अद्यापही ११ कोटी घरांची आवश्यकता आहे. या क्षेत्रात बॅँकिंग क्षेत्राला मोठे काम करण्याची संधी आहे, असे मोदी यांनी सांगितले.मुंबईत सुरू झालेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रसायनशास्त्राचे नोबेल सन्मानित कुर्ट वुथरिच यांचा सत्कार केला. - वृत्त/२