शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विशिष्ट जातीच्या महिलांना प्रवेश नाकारणा-या मंदिरात सर्व जाती-धर्माच्या महिलांकडून ओटीभरण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 14:22 IST

विशिष्ट जातीच्या महिलांना मंदिरात प्रवेश नाकारल्याच्या निषेधार्थ म्हसवड येथील अंबामाता मंदिरात भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सर्व जाती-धर्माच्या महिलांना सोबत घेऊन थेट गाभा-यात प्रवेश केला.

म्हसवड (सातारा) : विशिष्ट जातीच्या महिलांना मंदिरात प्रवेश नाकारल्याच्या निषेधार्थ म्हसवड येथील अंबामाता मंदिरात भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सर्व जाती-धर्माच्या महिलांना सोबत घेऊन थेट गाभा-यात प्रवेश केला. गुरुवारी सकाळी या मंदिरात प्रवेश केलेल्या महिलांच्या गर्दीत बुरखा घातलेली एक कार्यकर्तीही ठळकपणे जाणवत होती.येथील अंबामाता मंदिरात नवरात्रीमध्ये महिला उपनगराध्यक्षा स्नेहलता सूर्यवंशी यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी याच मंदिरात गुरुवारी गाभा-यात जाऊन दर्शन घेण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे त्यांच्या भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी मंदिरात जाऊन देवीच्या मूर्तीला ओटीभरण केले. मात्र यावेळी तृप्ती देसाई नव्हत्या. माधुरी टोणपे, रेखा सूर्यवंशी, वंदना मदने, सुमन फाळके आणि शबाना मुल्ला यांच्यासह अनेक महिला या अनोख्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाचे नेतृत्त्व राजकुमार डोंबे यांनी केले. तसेच काही वेळानंतर श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.यापूर्वीची घटना अशी की, म्हसवडच्या अंबामाता मंदिरात उपनगराध्यक्षा स्नेहलता सूर्यवंशी गेल्या होत्या. त्यावेळी ‘त्यांना तुम्ही कोण आहात याची माहितीही मला करून घ्यायची नाही. तुम्हाला देवीचे दर्शन घ्यायचे असेल तर ते लांबूनच घ्यावे लागेल,’ असे म्हणत पुजारी प्रकाश केसकर याने प्रवेश नाकारला होता. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध केला गेला होता. त्यानंतर संबंधित पुजाºयाने माफीही मागितली होती.