शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी विद्यार्थ्यांना छात्रवृत्ती मिळेना, 'महाज्योती'च्या प्रक्रियेला विलंब

By संदीप आडनाईक | Updated: January 24, 2026 15:49 IST

थकीत निधीही मंजूर न झाल्याने संताप

संदीप आडनाईककोल्हापूर : नोंदणी दिनांकापासूनची अधिछात्रवृत्ती मिळण्यासाठी महाज्योतीच्याच प्रक्रियेला विलंब होत असल्याबद्दल राज्यातील नऊशेहून अधिक ओबीसी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

बार्टी व सारथीच्या धर्तीवर महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) देण्याची प्रक्रिया राज्य शासन, महाज्योती आणि इतर मागास बहुजन मंत्रालयाने अद्याप सुरूच केलेली नाही. इतर दोन संस्थांची प्रक्रिया वेळेवर पूर्ण झाली, मात्र महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी अद्याप मागील थकीत निधीच मंजूर झालेला नसताना आता संस्थेकडून सहा महिन्याला होणारी कागदपत्रांची मागणीही वेळेवर होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या संतापात भर पडली आहे. महाज्योतीचे प्रशासन हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप संबंधित विद्यार्थ्यांनी केला आहे.कागदपत्रांची तपासणी करून त्रुटी नसल्यास विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती अदा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. परंतु जानेवारी संपत आला तरीही जुलै ते डिसेंबर २०२५ दरम्यानची संशोधन प्रगती अहवाल संदर्भातील कागदपत्रे मागविण्याची प्रक्रिया संस्थेने सुरूच न केल्यामुळे ओबीसी, भटके विमुक्त विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.बार्टी आणि सारथी संस्थेस नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्तीसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला, परंतु महाज्योतीच्या ओबीसी, भटके विमुक्त विद्यार्थ्यांना आवश्यक निधी उपलब्ध करून दिलेला नाही. असा भेदभाव करून बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थेस लागू केलेल्या समान धोरणाला राज्य शासनानेच केराची टोपली दाखविल्याची तक्रार होत आहे.

दैनंदिन खर्चाची विवंचनाअनेक विद्यार्थी संशोधनाच्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यांना तथ्य संकलनासाठी विविध ठिकाणी भेटी द्याव्या लागतात. त्यासाठी येणारा खर्च, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा विविध रसायनांवरही अफाट खर्च, संशोधन केंद्राच्या ठिकाणीच राहणाऱ्यांना घरभाडे, जेवण असा दैनंदिन खर्च करण्याची विवंचना आहे. अधिछात्रवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसाय न करण्याचे आदेश संस्थेने पूर्वीच दिले आहेत. त्यामुळे ते या छात्रवृत्तीवरच अवलंबून आहेत.

महाज्योती संस्थेमार्फत कागदपत्रे मागविण्याच्या प्रक्रियेला यंदा विलंब झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक व मानसिक ताण येत आहे. विद्यार्थ्यांचे संशोधन पूर्णतः अधिछात्रवृत्तीवर अवलंबून आहे, त्यामुळे तातडीने ही प्रक्रिया सुरू करून अधिछात्रवृत्ती अदा करावी. - सद्दाम मुजावर, महाज्योती संशोधक

English
हिंदी सारांश
Web Title : OBC students await scholarships as 'Mahajyoti' process delayed.

Web Summary : Over 900 OBC students are frustrated by delays in Mahajyoti scholarship disbursement. Unlike Barti and Sarathi, Mahajyoti hasn't released funds or requested necessary documents, causing financial strain as students depend on the scholarship for research expenses.