शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

OBC reservation: ‘ओबीसीं’च्या डेटाला आणखी विलंब लागणार, बांठिया आयोगाला मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 10:50 IST

OBC reservation: ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखालील समर्पित आयोगाला राज्य सरकारने पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. 

 मुंंबई : ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखालील समर्पित आयोगाला राज्य सरकारने पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण पुन्हा बहाल करण्यासाठी त्यांचे राजकीय मागासलेपण सिद्ध करणारा इम्पिरिकल डेटा समर्पित आयोगामार्फत गोळा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार बांठिया आयोगाची नियुक्ती ११ मार्च २०२२ रोजी करण्यात आली होती. तीन महिन्याच्या आत आयोगाने अहवाल द्यावा, असे राज्य सरकारने आयोगाची कार्यकक्षा निश्चित करणाऱ्या आदेशात स्पष्ट केले होते. हा डेटा याच महिन्यात तयार होईल व तो सर्वोच्च न्यायालयात लगेच सादर करून ओबीसी आरक्षण टिकविले जाईल, असा विश्वास छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे महाविकास आघाडीतील मंत्री करीत आले आहेत. तथापि, आता आयोगाच्या विनंतीनुसार आयोगाला येत्या ११ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी याबाबतचा आदेश १७ जून रोजी काढला.

मध्य प्रदेशच्या धर्तीवर डेटाची जुळवाजुळवआयोगामार्फत डेटा गोळा करताना ओबीसींची गणना ही आडनावांवरुन केली जात असल्याचा आक्षेप सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी घेतला होता. तसे न करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आयोगाला ग्रामविकास विभागाची यंत्रणा सध्या डेटा गोळा करण्यासाठी मदत करीत आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर हा डेटा गोळा केला जात आहे. मध्य प्रदेशने ९०० पानी डेटा तयार करून सर्वोच्च न्यायालयात सादर केला असता त्यांना ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल करण्यात आले होते.

अहवाल जुलैच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात?nआयोगाला मुदतवाढ देण्यात आल्याने आयोगाचा अहवाल येण्यासाठी जुलैच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका घेण्यासाठीच्या प्रक्रियेला गती दिली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण निश्चित केले आहे.n महापालिकांच्या प्रारूप मतदार याद्या २३ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. सप्टेंबरमध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी ओबीसींना आरक्षण बहाल होणार का, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार