शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

OBC Reservation in Maharashtra: वेळ साधावी लागेल! महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षण देता येणार; माजी खासदारांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 13:53 IST

OBC reservation Possible in Maharashtra: महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पाऊस जास्त नसतो त्या ठिकाणी निवडणुका घ्याव्यात असे न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या याचिकेवर म्हटले होते. त्यानंतर आज हा निकाल आला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणावरूनसर्वोच्च न्यायालयाने आज मध्य प्रदेश सरकारला मोठा दिलासा दिला आहे. निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्यास परवानगी दिली आहे. परंतू, इकडे महाराष्ट्राची वाट अवघड झाली आहे. यावर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षण शक्य असल्याचा दावा केला आहे. 

OBC Reservation Breaking News: निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील; मध्य़ प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिले तयारीचे आदेशओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने केवळ मध्य प्रदेश सरकारलाच परवानगी दिली आहे. तसेच मध्य प्रदेश निवडणूक आयोगाला एका आठवड्यात अधिसूचना काढण्याचे आदेश दिले आहेत. यावरून आता महाराष्ट्राच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतू, महाराष्ट्र सरकारने ट्रिपल टेस्ट पूर्ण न केल्याने पेच अडकला आहे. 

महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पाऊस जास्त नसतो त्या ठिकाणी निवडणुका घ्याव्यात असे न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या याचिकेवर म्हटले होते. त्यानंतर आज हा निकाल आला आहे. यावर माजी खासदार आणि आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेणे शक्य असल्याचे म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोगाद्वारे वार्ड रचना करण्यासाठी कमीत कमी पंधरा दिवस आणि मतदार यादी दुरुस्त करण्यासाठी एक महिन्याचा वेळ लागेल. दरम्यान वीस ते पंचवीस दिवसाच्या आत इंपिरिकल डाटा मिळेल, त्यामुळे महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षण मिळेल, असे ते म्हणाले. 

महाराष्ट्रात काय पेच....मंडल आयोगाने ५४ टक्के समाजाला दिलेले २७ टक्के आरक्षण लोकसभेने मान्य केले आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केले आहे. मात्र ट्रिपल टेस्ट सुचविल्या होत्या. त्यापैकी दोन टेस्ट राज्य सरकारने पूर्ण केल्या. मात्र तिसरी टेस्ट इम्पिरिकल डाटाशिवाय पूर्ण होणार नाही. मध्य प्रदेश राज्याने निवडणूक आयोगाकडे असलेल्या डाटाचा वापर केला आहे. तसा वापर करता येईल का याचादेखील विचार आयोगाने करावा अशी विनंती आम्ही आयोगाला केली आहे, असे भुजबळ म्हणाले होते.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय