शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

OBC Reservation : निवडणुका पुढे ढकला, राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 05:53 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण गेल्याचे तीव्र पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले.

मुंबई : राज्यात २१ डिसेंबरला होत असलेली १०५ नगर पंचायती, दोन जिल्हा परिषदा, १५ पंचायत समित्यांची सार्वत्रिक व चार महापालिका तसेच ४,४५४ ग्राम पंचायतीमध्ये होत असलेली पोटनिवडणूक पुढे ढकलावी, असा ठराव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी करण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाला हा प्रस्ताव देण्यात येणार आहे. राज्य सरकारतर्फे आयोगाला गुरुवारी एक पत्र दिले जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण गेल्याचे तीव्र पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल चिंता व्यक्त करतानाच ओबीसी आरक्षणाशिवाय कोणतीही निवडणूक राज्यात होता कामा नये याबाबत एकमत होते. राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करावी, असा सूर होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यास संमती दिली. याबाबतची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांना दिली.त्यामुळे ओबीसी आरक्षण नसेल तर निवडणूक घेऊ नका, अशी मागणी राज्य सरकारने आयोगाकडे केली तर ती मान्य होण्याची शक्यता नाही. म्हणून आता ओमायक्रॉनचे कारण देऊन या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली जाईल, अशी शक्यता आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास विस्तारित खंडपीठासमोर आव्हान देणे हा देखील एक पर्याय आहे.आयएएस अधिकारी नेमणार, पूर्ण निधीही देणारराज्य मागासवर्ग आयोग इम्पिरिकल डाटा गोळा करत असताना एका आयएएस अधिकाऱ्याची विशेष नियुक्ती केली जाईल. २००३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी एस. एन. भांगे यांच्याकडे ही जबाबदारी असेल. आयोगाने ४३५ कोटी रुपयांची मागणी केली होती पण त्यांना केवळ पाच कोटी रुपयेच देण्यात आले. आयोगाला लागेल तेवढा निधी विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मंजूर केला जाईल, असे मंत्रिमंडळ बैठकीत ठरविण्यात आले.

संपूर्ण निवडणूक कार्यक्रम नव्यानेसर्वोच्च न्यायालयाच्या ६ डिसेंबरच्या अंतरिम स्थगितीनुसार राज्य निवडणूक आयोगाने २१ डिसेंबरच्या निवडणुकीतील ओबीसी राखीव जागांवरील निवडणूक आहे त्या टप्प्यावर स्थगित केली होती. आता या जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घ्यावी लागेल. आधीचा सर्व टप्पा रद्द होईल. या जागा आयोगास खुल्या प्रवर्गात जातील. त्यातील ५० टक्के जागा महिला राखीव करून निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर करावा लागेल.

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्रOBC Reservationओबीसी आरक्षण