शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

OBC आरक्षणाची ठाकरे सरकारनं राजकीय हत्या केलीय; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 14:03 IST

सुप्रीम कोर्टात मध्य प्रदेश सरकारनं इम्पिरिकल डेटा सादर केला. त्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहे. महाराष्ट्र सरकार ओबीसी विरोधी आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई – मध्य प्रदेश सरकारनं सुप्रीम कोर्टात इम्पिरिकल डेटा सादर केल्यामुळे त्याठिकाणी ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने दिला. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाराष्ट्रातील सरकारच्या डोळ्यात अंजण घालण्याचं काम करेल. खोटे लोक खोटी माहिती देत आहेत. इम्पिरिकल डेटा सुप्रीम कोर्टात सादर करत नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची हत्या महाविकास आघाडी सरकारने केलीय असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, महाराष्ट्राचा अजूनही इम्पिरिकल डेटा तयार झाला नाही. सुप्रीम कोर्टानं मध्य प्रदेशबाबत घेतलेल्या निर्णयानंतर डोळ्यात अंजण घालण्याचं काम केले आहे. दीड वर्षापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करून ओबीसी राजकीय आरक्षण देऊ शकलो असतो. १३ डिसेंबर २०१९ रोजी सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट पूर्ण करा असा पहिला आदेश आहे. अडीच वर्ष पूर्ण झाले तरी सरकारचे हे अपयश आहे. महाराष्ट्र सरकारनं ओबीसींच्या आरक्षणाची राजकीय हत्या केली आहे. मध्य प्रदेश सरकारनं इम्पिरिकल डेटा दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. मध्य प्रदेशने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन केले. इम्पिरिकल डेटा, ट्रिपल टेस्ट पूर्ण केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच जबाबदार मंत्र्यांनी राजीनामा दिले पाहिजे. सुप्रीम कोर्टात मध्य प्रदेश सरकारनं इम्पिरिकल डेटा सादर केला. त्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहे. सरकार ओबीसी विरोधी आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं हे सरकारला वाटत नाही. खोटे लोक, खोटी माहिती देतात. तुम्ही केवळ राजकारण करत राहिला. कारण मनापासून त्यांना आरक्षण द्यायचं नाही. आम्ही सरकारवर दबाव टाकणार असून रस्त्यावर उतरून आंदोलन करू. केवळ सरकारच्या नाकर्तेमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Reservation) गेले. जोपर्यंत सरकार इम्पिरिकल डेटा सुप्रीम कोर्टात सादर करत नाही तोवर शांत बसणार नाही. आंदोलन करत राहू असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOBC Reservationओबीसी आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय