शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
2
इंग्रजी येत नाही..., यांना यांच्या देशात परत पाठवा! भारतीयांवर ब्रिटिश महिला भडकली; म्हणाली...
3
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
4
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
5
विरोध झुगारला, मराठी माणूस एकवटला; अखेर मीरारोडमध्ये प्रचंड संख्येत मोर्चा निघाला
6
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
7
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
8
वनप्लसने नॉर्ड ५ मध्ये १३ सिरीजचा कॅमेरा आणला खरा...; मॅरेथॉन बॅटरी अन् परवडणारी किंमत... कसा वाटला...
9
मुकेश अंबानींचा २० रुपयांचा शेअर बनला रॉकेट! ट्रम्प यांच्या एका निर्णयाने १५% वाढ, अजूनही खरेदी करण्याची संधी?
10
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुपूजन, गुरुमहती, गुरुतत्त्व कालातीत; आजही आहे गुरुला महत्त्व
11
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
12
क्रिकेटर यश दयालला होऊ शकतो १० वर्षांचा तुरुंगवास; पीडित मुलीने पोलिसांना दिले 'हे' पुरावे
13
"जोकोविच ३८ वर्षांचा असून १०० टक्के देतोय; अन् विराट कोहली ३६ व्या वर्षी..."
14
मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना बॉटल फेकून मारली, जोरदार घोषणाबाजी; सरनाईक आल्यानंतर काय घडलं? 
15
४ ग्रह वक्री विपरीत राजयोग: ५ राशींना लाभच लाभ, मान-सन्मान-आदर; इच्छापूर्तीचा वरदान काळ!
16
SENA देशांत टीम इंडिया नंबर वन! इंग्लंडच्या खांद्यावरून साधला पाकवर निशाणा
17
फक्त शाम्पू आणि तेल नाही तर केसांच्या आरोग्यासाठी योग्य कंगवा निवडणं अत्यंत महत्त्वाचं
18
प्रयत्न करूनही नोकरी मिळत नव्हती, अखेर RESUME मध्ये लिहिलं असं काही, मिळू लागल्या ऑफरवर ऑफर
19
Elon Musk America Party: मस्क यांच्या पक्षात भारतीय वंशाच्या वैभव यांच्याकडे मोठी जबाबदारी; कमाई पाहून अवाक् व्हाल
20
१.२५ लाख दररोज? पंतप्रधान मोदींच्या नावाने लाखो लुटण्याचा प्रयत्न, तुम्ही तर फसला नाहीत ना?

“...तर शरद पवार ४ ते ५ वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 19:06 IST

Laxman Hake On Sharad Pawar News: लक्ष्मण हाके म्हणाले की, शरद पवारांना निवडणुका जिंकण्याचे व्याकरण कळले, पण...

Laxman Hake On Sharad Pawar News: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला चार ते पाचवेळा गेले. ओबीसी समाजाच्या आरक्षणाबद्दल त्यांनी एकही शब्द काढला नाही. मग अशा माणसाला तुम्ही कधी धडा शिकवणार काय? मराठा आरक्षणाच्या नावाखाली मनोज जरांगे पाटील संपूर्ण राज्याला वेठीला धरत आहेत, अशी टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली. 

एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असताना दुसरीकडे आरक्षणाचा मुद्दाही तापताना दिसत आहे. मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि ओबीसीतून मराठा आरक्षण देऊ नये, ही मागणी लावून धरणारे लक्ष्मण हाके हे दोन्ही आंदोलक आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. दोन्ही आंदोलक नेते राज्यातील विविध ठिकाणी जाऊन बैठका, सभा घेत आहेत. लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

...तर शरद पवार ४ ते ५ वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते

एका मेळाव्यात बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, राष्ट्रवादीचे शरद पवार यांना निवडणुका जिंकण्याचे व्याकरण कळले. पण ओबीसीतील अठरापगड जातीचे अंतःकरण कळले नाही. ते समजले असते तर शरद पवार ४ ते ५ वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते, असा टोला लगावत, नांदेड जिल्ह्यातून पाच ओबीसी आमदार विधानसभेत पाठवा, असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले. 

दरम्यान, मनोज जरांगे पाटील मराठा-ओबीसी वाद लावण्याचे काम करत आहेत. कुणालाही आमच्या हक्कावर गदा आणू दिली जाणार नाही, महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी लक्ष्मण हाकेंनी दिली. 

टॅग्स :laxman hakeलक्ष्मण हाकेSharad Pawarशरद पवार