नाशिक : नायलॉन मांजामुळे गुरुवारी दोघा दुचाकीस्वारांचा गळा नायलॉन मांजाने चिरला गेला आहे. संक्रांतपूर्व नायलॉन मांजाने जखमी होण्याच्या पाच घटना आतापर्यंत शहरात घडल्या आहेत.गुरुवारी दीपक शंकरसिंग ठाकूर हा युवक दुचाकीने जात असताना नायलॉन मांजा तुटून त्याच्या गळ्यात अडकला आणि त्याचा गळा कापला गेला. गंभीर जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. ठाकूर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुसरी अशोकनगरमध्ये राजेंद्र विश्वकर्मा दुचाकीने कुटुंबासमवेत घराकडे जात असताना त्यांच्याही मानेला नायलॉनच्या मांजाचा फास लागल्याने गंभीर दुखापत झाली. त्यांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. (प्रतिनिधी)
नायलॉन मांजाने चिरला दोघांचा गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 05:19 IST