शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
4
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
5
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
6
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
7
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
8
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
9
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
10
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
11
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
12
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
13
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
14
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
15
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
16
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
17
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
18
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
20
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी

कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 03:56 IST

पूर्वी विक्रीकर असताना ७० हजार व्यापारी कर भरत होते, आता जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर ही संख्या अडीच लाखांवर जाऊन पोहचली आहे, जीएसटीमुळे आगामी काळात राज्याला १० ते १५ हजार कोटी रुपये अधिकचे उत्पन्न मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुणे : पूर्वी विक्रीकर असताना ७० हजार व्यापारी कर भरत होते, आता जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर ही संख्या अडीच लाखांवर जाऊन पोहचली आहे, जीएसटीमुळे आगामी काळात राज्याला १० ते १५ हजार कोटी रुपये अधिकचे उत्पन्न मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याचबरोबर आयकर भरणाºयांची संख्याही ३ कोटींवरून ६ कोटी वाढल्याचे त्यांनी सांगितले.रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने अमित शहा यांनी लिहिलेल्या ‘भाजपा राजकारणात कशासाठी’ या पुस्तकाच्या मराठी, इंग्रजी व हिंदी आवृत्तींचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार विनय सहस्रबुद्धे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, रवींद्र साठे उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘केंद्र शासनाच्या करणी आणि कथनीमध्ये अंतर नाही. केंद्राकडून सत्तेवर आल्यापासून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदयाचा विचार अंमलात आणला जात आहे. देशात ५० टक्के लोकांना शौचालये नव्हती, त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून घर तिथे शौचालय उभारण्याची योजना सुरू करण्यात आली. गॅस सबसिडी सोडण्याचे अभियान मोदी यांनी सुरू केले, त्यानंतर केंद्राचे १४ हजार कोटी रुपये वाचले आहेत. त्यातून ग्रामीण भागातील गरीब महिलांना गॅसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. काळ्या पैशांवर टाच आणण्याचे काम मोदी सरकारने केले. बेनामी संपत्ती जप्त करण्याच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली.’’भाजपामध्ये बूथवर काम करणारा कार्यकर्ताही पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो, इतर पक्षात हे दिसून येत नाही. भाजपामध्ये प्रामाणिकपणे लोकशाही माध्यमातून मोठ्या पदावर पोहचण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळेच चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान बनू शकला. सोनियांना त्यांच्या पुढच्या पिढीची चिंता आहे, तर मोदींना देशाच्या पुढच्या पिढीची चिंता असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, ‘‘तत्त्वनिष्ठा आणि परिश्रमाचा संयोग अमित शहा यांच्यामध्ये आढळतो. शहा यांनी पुस्तकामध्ये मांडलेले विचार जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे.’’ रवींद्र साठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर योगेश गोगावले यांनी आभार मानले.शहांच्या पुस्तकातून कार्यकर्त्यांना प्रेरणाभाजपाचे अध्यक्ष अमित शहा गेले काही दिवस देशव्यापी दौरा करीत आहेत. या दौºयामध्ये त्यांनी कार्यकर्ते व विविध स्तरांमधील लोकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी भाजपाचा इतिहास, वर्तमान वाटचाल मांडणारे पुस्तक लिहिले आहे. यामुळे कार्यकर्त्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल. इतर पक्षांचे कार्यकर्ते, विश्लेषक यांनीही हे पुस्तक वाचल्यास भाजपाविषयी असलेले त्यांचे गैरसमज दूर होतील. लोकशाहीची स्थिती काय, विचारधारा काय, काम कसे केले या ३ मुद्द्यांवर राजकीय पक्षांच्या कामगिरीचे मूल्यमापन व्हावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपा