शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना सक्रिय रुग्णांची संख्या ३५ टक्क्यांनी घटली; राज्याच्या आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 07:05 IST

राज्यात ९ जानेवारी रोजी ५२ हजार ९६० सक्रिय रुग्ण होते. यात मोठ्या प्रमाणात घट होऊन ८ फेब्रुवारी रोजी हे प्रमाण ३४ हजार ७२० वर आले आहे.

मुंबई : कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळाच्या तुलनेत मागील काही दिवसांत राज्यात दैनंदिन रुग्ण व मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. याशिवाय मागील एका महिन्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत ३५ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात ९ जानेवारी रोजी ५२ हजार ९६० सक्रिय रुग्ण होते. यात मोठ्या प्रमाणात घट होऊन ८ फेब्रुवारी रोजी हे प्रमाण ३४ हजार ७२० वर आले आहे.टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, अनलॉकचा पुढचा टप्पा आणि आता सर्वसामान्यांसाठीही लोकल सुरू झाल्याने सामान्य नागरिकांनी किमान पुढील सहा महिने तरी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वच्छता राखणे, मास्कचा वापर आणि शारीरिक अंतर राखणे या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, राज्यात सक्रिय रुग्णसंख्या कमी होत आहे, ही बाब दिलासादायक आहे. मात्र, सामान्यांनीही संसर्ग नियंत्रणासाठी प्रयत्न केला पाहिजे. सोबतच तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी सामान्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. लसीविषयी गैरसमज किंवा अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण प्रक्रियेत सहभाग घेतला पाहिजे.७३ टक्के खाटा रिक्तपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, सध्या शहर, उपनगरात कोरोना नियंत्रणात आहे. यंत्रणा संसर्ग पसरू नये यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, नागरिकांनीही योगदान देऊन मार्गदर्शक नियमांचे पालन करावे. ऑक्‍टोबर, नोव्हेंबरच्या तुलनेत दैनंदिन रुग्णांमध्येह घट झाली आहे. परिणामी, सध्या शहर व उपनगरात कोरोना रुग्णांसाठीच्या ७३ टक्के खाटा रिक्त आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या