शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता हातावर टाळी नाही, तर कानाखाली - राज, उद्धवचे नीच राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 05:37 IST

माझे सहा नगरसेवक फोडून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी अत्यंत नीच राजकारण केले आहे. मी हे कधीच विसरणार नाही. उद्धवच्या याच घाणेरड्या राजकारणामुळे मी शिवसेना सोडली होती.

 मुंबई : माझे सहा नगरसेवक फोडून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी अत्यंत नीच राजकारण केले आहे. मी हे कधीच विसरणार नाही. उद्धवच्या याच घाणेरड्या राजकारणामुळे मी शिवसेना सोडली होती. त्यामुळे यापुढे हातावर नाही, तर गालावर टाळी देऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे.मुंबई महापालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्यावर राज यांनी आज संतप्त शब्दांत टीका केली. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, सेनेने केलेल्या या राजकारणाचा राज्यातील जनतेला राग आहे. शिवसेनेला आमचे नगरसेवक हवे होते तर मी सहा कशाला सातच्या सात नगरसेवक पाठवले असते. पण प्रत्येकी पाच पाच कोटी देऊन सहा नगरसेवक फोडले. सहा जण खरेदी करण्यासाठी तीस कोटी आणले कुठून? बरं एवढं करून सोशल मीडियावर असे भासवले जात आहे की, हे सगळं मी आणि उद्धवने मिळून केले. असले दळभद्री राजकारण मी कधी केले नाही आणि मला करताही येत नाही.दुसºयांचे नगरसेवक, आमदार फोडून मला माझा पक्ष उभा करायचा नाही. त्यामुळेच मी कोणत्याही पोटनिवडणुकीत कधीही उमेदवार उभे केले नाहीत. या घटनेनंतर मला शिवसेनेचे नगरसेवक म्हणाले, शिवसेनेपेक्षा आम्ही दुसºया पक्षात असतो तर बरे झाले असते. आम्हाला आमच्या पक्षात राहून कधी काही मिळाले नाही; पण बाहेरुन आलेल्यांना पाच पाच कोटी मिळाले अशा भावना शिवसेना नगरसेवकात आहेत, असा दावाही राज यांनी केला.महापौर बंगला की पार्टी करण्याचा अड्डा?बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्यात करायचे असे सांगितले जाते; मात्र त्याठिकाणी परवा शिवसेनेचे नगरसेवक रात्री पार्टी करत होते. पोलिसांना खबर लागली. काही पोलिस तिकडे येत आहेत असे कळताच सगळ्यांनी तेथून पळ काढला. त्याचे फोटोहीव्हायरल झाले. हे कसले बाळासाहेबांचे स्मारक करणार? असल्या घाणेरड्या राजकारणाची किळस येते असेही राज ठाकरे म्हणाले.दीड महिन्यापासून होती कुणकुण!फोडाफोडीचे राजकारण करून सेनेने मराठी माणसाचा घात केला. जाणाºया सहा नगरसेवकांबद्दल दीड महिन्यापासून कुणकुण होती. मात्र ज्यांनी स्वत:ला बाजारात विकायला ठेवले आहे, ते मानसिकदृष्ट्या भ्रष्ट आहेत, त्यांना ठेवून तरी काय करणार? महाराष्ट्रात राजकारण उमदे असावे. कुणी आयुष्यभर सत्तेत राहत नाही. एखादी गोष्ट करताना चुकीचा पायंडा पाडत नाही ना, याचे भान पक्षांनी ठेवायला हवे, अशी अपेक्षाही राज यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना