शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता नवी सुशासन नियमावली; सेवा कायदा आणि दप्तर दिरंगाई कायद्याला बळकटी देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 12:12 IST

कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आदिवासी विकास, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देऊन अन्य राज्यांना आदर्श ठरेल, अशी नियमावली तयार करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी गुरुवारी पार पडली.

मुंबई : लोकांची कामे जलदगतीने व्हावी, त्यांना शासकीय सेवांचा लाभ योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत मिळावा यासाठी आता सुशासन नियमावली केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.  कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आदिवासी विकास, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देऊन अन्य राज्यांना आदर्श ठरेल, अशी नियमावली तयार करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी गुरुवारी पार पडली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष निवृत्त उपलोकायुक्त सुरेश कुमार, माजी मुख्य सचिव तथा समिती सदस्य जयंतकुमार बांठिया, स्वाधीन क्षत्रिय, के. पी. बक्षी, अजितकुमार जैन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते. शासन व नागरिक यांच्यातील अंतर कमी करण्याच्या अनुषंगाने सुशासन नियमावली तयारी केली जाणार आहे. प्रशासनाचे सुशासन होण्यासाठी  ही नियमावली उपयुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत व्यक्त केला. प्रशासन गतिमान करतानाच माहिती आणि तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावीपणे वापर करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, शेतकऱ्यांसाठी जोडधंदा, शेतीत आधुनिक तंत्रज्ञान यासाठी उपाययोजना सुचविताना त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घ्यावी, नैसर्गिक आपत्तींबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांचाही नियमावलीमध्ये समावेश करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी समितीला केली.    कुपोषणावरील उपाययोजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी शोधून त्यावरदेखील समितीने उपाययोजना सुचवाव्यात असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

दप्तरी हेलपाटे नको !   दप्तर दिरंगाई कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी नियमावलीमध्ये त्याचा समावेश करावा, असे सांगत लोकांचे काम वेळेवर झाले तरच त्याला सुशासन म्हणता येईल, नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नये, क्षेत्रीय स्तरावरच त्यांच्या समस्यांचा निपटारा व्हावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विभागीय स्तरावर असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाचे कामकाज अधिक गतिमान करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.   

 काय आहे सेवा हमी कायदा?- जनतेस सेवेचा हक्क देणारा कायदा - विविध दाखले, प्रमाणपत्रे वितरण यांच्यासह १०५ सेवांचा समावेश- जनतेस पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त- कायद्यात नमूद दिवसांत सेवा दिली नाही तर ५०० ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड, काही प्रकरणात निलंबनाची कारवाई काय आहे दप्तर दिरंगाई कायदा? - शासकीय अधिकाऱ्यांना एखादी फाईल अडवून ठेवण्यास प्रतिबंध घालण्यासाठी कायदा- माहितीचा अधिकार कायदा प्रभावीपणे अंमलात यावा यासाठी हा कायदा - शासकीय अधिकाऱ्याने एखादी फाईल ठरावीक दिवसांत पुढे पाठविण्याची तरतूद, अन्यथा कारवाई 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारGovernmentसरकार