शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्ष्य ३३ कोटी वृक्ष लागवडीचे - सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:29 IST

राज्य सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेस मिळणारा प्रतिसाद पाहाता पुढील वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी १४ कोटी ७१ लाख वृक्षांची लागवड झाली आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेस मिळणारा प्रतिसाद पाहाता पुढील वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी १४ कोटी ७१ लाख वृक्षांची लागवड झाली आहे. या मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच यापुढे दर सहा महिन्यांनी वृक्ष लागवडीचे लेखापरीक्षण केले जाईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.वृक्ष लागवडीतून पर्यावरण रक्षण होत असल्याने सजीवांच्या निरोगी आयुष्यासाठी ही बाब महत्वाची आहे. वृक्षाच्छादन तसेच रोजगार, उत्पन्न वृद्धीही अपेक्षित आहे. याच भावनेतून राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी वनेतर क्षेत्रातही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला. पहिल्या टप्प्यात दोन कोटी ८२ लाख, दुसऱ्या टप्यात पाच कोटी ४३ लाख वृक्षांची लागवड केली होती, यंदा १४ कोटी ७१ लाख वृक्षांची लागवड झाल्याचे त्यांनी सांगितले.औरंगाबाद जिल्ह्याने सर्वाधिक ९६ लाख, नांदेड जिल्ह्याने ८२ लाख झाडांची लागवड केली. मागील दोन वर्षांत लावलेल्या झाडांपैकी सुमारे ७७ टक्के झाडे जगली आहेत. भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार राज्याचे वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादन २७३ चौरस किमीने वाढले आहे. राष्ट्रीय वन नीतीनुसार ३३ टक्के वनक्षेत्र करण्यासाठी आणखी १३ टक्के वनक्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. यासाठी साधारणत: ४०० कोटी वृक्ष लावणे, जगवणे आवश्यक आहे. लावलेली झाडे किती प्रमाणात जगली याच्या तपासणीसाठी जिल्हा, गाव पातळीवर समित्या स्थापन करण्यात येतील. दर सहा महिन्यांनी वृक्ष लागवडीचे आॅडिट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार