शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आता स्वबळाच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 04:44 IST

भाजपा ज्या पद्धतीने शिवसेनेला वागणूक देत आहे ती पाहता लोकसभा किंवा कोणत्याही निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढण्याची शक्यता नाही.

विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा ज्या पद्धतीने शिवसेनेला वागणूक देत आहे ती पाहता लोकसभा किंवा कोणत्याही निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढण्याची शक्यता नाही. त्यामुळे आता स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी संपर्क नेत्यांच्या बैठकीत दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला स्थान मिळाले नाही. एवढेच नव्हे तर मित्र पक्ष म्हणून कोणत्याही बाबतीत विश्वासात घेतले जात नाही. राज्यातही भाजपा-शिवसेनेतील संबंध ताणले गेले आहेत. ‘एनडीएचा मृत्यू झाला आहे’, अशी प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी रविवारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर दिली होती.या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांनी संपर्क नेते, संपर्क प्रमुखांच्या घेतलेल्या बैठकीत ‘एकला चलो रे’चा आदेश दिल्याची माहिती आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजपाने एकत्रितपणे लढविली होती, मात्र विधानसभा निवडणूक दोघेही स्वबळावर लढले होते.निवडणुका जवळ येतील तशी शिवसेनेची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाईल. त्यांना घाबरण्याचे काहीही कारण नाही. तालुक्यातालुक्यातील आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे. थेट बूथपर्यंत नेटवर्क तयार करा. उद्या स्वबळावर लढायचे म्हटले तर हीच यंत्रणा कामास येईल, असे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा