शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आता मिथेनॉल निर्मिती करा; नितीन गडकरी यांचे राज्य सरकारला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 12:39 IST

Nitin Gadkari : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित दोन दिवसीय साखर परिषदेत ते बोलत होते.

पुणे : जगात अमेरिका, कॅनडा, चीन येथे सर्व ट्रक मिथेनॉलवर चालतात. तर भारतातही आता आसाममध्ये कोळशापासून मिथेनॉल निर्मिती सुरू झाली आहे. मिथेनॉलचा दर २४ रुपये प्रति लिटर आहे. त्यामुळे हे खूप परवडणारे आहे. त्यामुळे राज्यात मिथेनॉलवर आधारित अर्थव्यवस्था सुरू करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित दोन दिवसीय साखर परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यात आरसीएफ, व दीपक फर्टीलायझर्स या कंपन्या मिथेनॉल तयार करतात. त्यामुळे येणाऱ्या काळात विदर्भातील कच्च्या कोळशापासून मिथेनॉल करता येईल. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात क्रांतीची गरज आहे. 

सरकार म्हणून सर्वांच्या सोबत आहे, शक्यत ते सर्व करू : मुख्यमंत्री ठाकरेमला आनंद आहे की शरद पवार यांनी साखरेचा गोडवा राजकारणात आणला आहे, सर्व पक्षांचे नेते पक्षीय जोडे बाजूला काढून राज्याच्या, देशाच्या हिताच्या गोष्टी करताहेत, हेही नसे थोडके. त्यासाठी सरकार म्हणून सर्वांच्या सोबत आहे. जे शक्य आहे, ते नक्कीच करू, असा निश्चय सर्वांनीच केला आहे. त्याला यश मिळो, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ठाकरे म्हणाले, केंद्रीय पातळीवर साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनी एकत्र यावे.

हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस तोडणीचे नियोजन हवे : पवारराज्यात भविष्यात उसाचे क्षेत्र आणखी वाढणार आहे. त्यामुळे येत्या हंगामात ऊस तोडणीचे नियोजन हंगाम सुरू होण्याआधी करावे लागेल. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे ऊस तोडणी आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे.  साखर आयुक्तालय आणि साखर कारखान्यांनी योग्य नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असा सल्ला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीbusinessव्यवसाय