शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता आपले पंतप्रधान जगातील नेत्यांच्या पाठीवर हात ठेवतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 06:09 IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी : नरेंद्र मोदी २०-२० तास काम करतात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नरेंद्र मोदी यांच्या रूपाने अनेक वर्षांनंतर भारताला एक आत्मनिर्भर पंतप्रधान लाभले आहेत. ते २०-२० तास काम करतात. देश आता अधिक गतीने प्रगती करीत आहे. जगात भारतातील लोक आता गौरव करू लागले आहेत. पूर्वी जगातील नेते आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीवर हात ठेवायचे; परंतु आता चित्र बदलले आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरातील नेत्यांच्या पाठीवर हात ठेवतात, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. 

पहिल्यांदा देशासाठी वीस-वीस तास काम करणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या जादूमुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे. मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती. आमच्या प्रथा, परंपरांना लोक नावं ठेवायची. मात्र, आज मोदींमुळे देशाचा जगात गौरव वाढत आहे, असेही ते म्हणाले. गुरुवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानावरून राज्यपाल  बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती डॉ. अनिल काकोडकर होते.

१०० वर्षे एखादी संस्था विद्यादानाचे काम करते, हे अतिशय प्रेरणादायी आहे. या भूतकाळातून नव्या भविष्याचा आराखडा आम्हाला तयार करायचा आहे. या विद्यापीठातून देशाचा गौरव वाढवणारी नामवंत मंडळी तयार झाली आहेत.  नितीन गडकरी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांना घडविणारे हे ज्ञानपीठ असल्याचे राज्यपाल म्हणाले. 

नागपूरचे गडकरी हे रोडकरीराज्यपालांनी यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही गुणगान केले. ते म्हणाले, नितीन गडकरी हे नागपूर विद्यापीठाचेच विद्यार्थी. आज देशात गडकरी हे आपल्या कामामुळे रोडकरी म्हणून सन्मानाने ओळखले जातात. यावेळी  त्यांनी पुन्हा एकदा मराठी भाषेवरील आपल्या प्रेमाचा पुनरुच्चार केला. 

तुकडोजी महाराजांना प्रत्यक्ष ऐकले होतेnमहाराष्ट्रातील विद्यापीठांची नावे संतांच्या नावाने असल्याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना आपण प्रयागमध्ये प्रत्यक्ष ऐकले होते, असे सांगत राष्ट्रसंतांच्या ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ या गीताचा उल्लेख करून कर्तृत्ववान पिढी निर्माण करण्याचे कार्य विद्यापीठाने करावे. nज्येष्ठ वैज्ञानिक होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती डॉ. अनिल काकोडकर यांनी आपल्या भाषणात विद्यापीठांनी केवळ विद्यार्थीच घडवू नये, तर देश घडविण्याचे दायित्व व भूमिका आपल्याकडे घ्यावी, असे आवाहन केले. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी