शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

आता नर्सिंग हे प्रोफेशन!

By admin | Updated: May 7, 2017 07:00 IST

फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांची जयंती १२ मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरी केली जाते. सुरुवातीला

 - मुमताज कय्युम शेख - 

प्रभारी अधिसेविका, जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे

फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांची जयंती १२ मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरी केली जाते. सुरुवातीला रुग्णांकडे व आरोग्यसेवेकडे पाहण्याचा परिचारिकांचा दृष्टिकोन उपचारात्मक होता. परंतु, आता सर्वांगीण म्हणजेच प्रतिबंधात्मक, आरोग्यवर्धक, निदानात्मक, उपचारात्मक व पुनर्वसनात्मक आहे.नर्सिंग पूर्वी एक व्यवसाय व समाजसेवा होती. आता नर्सिंग हे प्रोफेशन असून ज्याला काही नियम-अटींची मर्यादा आहे. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त या बदलांचा वेध घेणारा लेख...धुनिक नर्सिंग संस्थापिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांची जयंती दरवर्षी १२ मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरी केली जाते. नर्सिंग हे जगातील सर्वात मोठे आरोग्यसेवा क्षेत्र आहे. नर्सेस या मिलेनिअम डेव्हलपमेंट गोल्स (एमडीजी) साध्य करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सध्याच्या स्थितीत मानसोपचारित, सामाजिक, सर्वांगीण आरोग्य इत्यादींसारख्या सर्व पैलूंद्वारे रुग्णाचे आरोग्य सुधारण्यासाठी व आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी परिचारिका चांगल्या प्रशिक्षित आहेत. जगभरातील सर्व नर्सेस १२ मे रोजी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रम राबवतात. ५ ते १२ मे हा संपूर्ण आठवडा ‘नर्सेस वीक’ म्हणून साजरा होतो. त्यात पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळ्यानंतर पॅनल डिस्कशन, सेमिनार, गायन, नृत्य स्पर्धा, पेंटिंग, पोस्टर प्रदर्शन, प्रश्नमंजूषा, वादविवाद स्पर्धा व मैदानी खेळ अशा विविध स्पर्धा नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी, परिचारिका व स्टाफ नर्सेससाठी आयोजित केल्या जातात. तसेच अद्वितीय कार्य करणाऱ्या नर्सेसना सन्मानित केले जाते. या दिनाच्या निमित्ताने पर्यावरण स्वच्छता, नर्सिंग प्रोफेशनचा व्यावसायिक दर्जा उंचावण्यासाठी, सध्याच्या समाजातील आजार व आरोग्यस्थितीचा आढावा घेऊन दरवर्षी थीम घोषवाक्य ठरवले जाते. या वर्षीचे थीम वाक्य आहे, ‘आघाडीचा आवाज : निरंतर विकासाची लक्ष्ये प्राप्त करण्यासाठीचा’...अद्ययावत तंत्रज्ञानामुळे एकविसाव्या शतकात लोकांच्या कार्यशैलीत आणि कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल पाहायला मिळतात. बदल आणि तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे आणि नर्सिंग क्षेत्रही याला अपवाद नाही. बदलत्या काळाबरोबर लोकसेवेच्या गरजा, आजारांच्या प्रादुर्भावानुसार वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाची साथ घेत नर्सिंग क्षेत्रातही उत्तरोत्तर प्रगती होत गेली आहे. जसे की, पूर्वी नर्सिंग कौशल्य दाखवताना प्रूफ किंवा रिसर्चवर आधारित नसायचे, परंतु आता आपल्या नर्सिंग स्टेप प्रोसिजरमध्ये प्रत्येक ठिकाणी विज्ञान आहे. एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टीस केली जाते. नर्सेसने बाळगायच्या रिपोर्ट्समध्येही बरेच बदल झाले आहेत. पूर्वी स्वत: व्हायटल पॅरामीटर्स तपासण्यासाठी विशेष तंत्र उपलब्ध नव्हते. परंतु, आता डिजिटल थर्मोमीटर, डिजिटल बीपी अ‍ॅपराटस, पल्स आॅक्सोमीटरमुळे कमी वेळात व कमी श्रमात पॅरामीटर्स तपासता येतात. इन्फ्युजन पम्पामुळे डॉट्स आॅटोरेग्युलेट होऊन जो काही लोडेड डोस आहे, तो अ‍ॅक्युरेटली दिला जातो. पूर्वीपेक्षा आता इन्फेक्शन कंट्रोल व बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटच्या स्कील्स निर्माण झाल्याने पेशंट व नर्सेसना कामाच्या ठिकाणी आजारांपासून संरक्षण मिळते. स्टीम इन्हेसनऐवजी नेब्युलायझेशन दिले जाते. केअर देण्याचा जो हेतू आहे, तो पूर्वीप्रमाणे क्युरेटिव्ह नसून कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण अवघ्या सेकंदांत ग्लुकोमीटरद्वारे तपासता येते. तसेच, लघवीतील साखर, प्रोटीन्स हे युरिस्ट्रीप्ससुद्धा तपासले जाते. बऱ्याच नर्सिंग प्रोसिजर्स कालांतराने आउटडेटेड झाल्या आणि तंत्रज्ञानामुळे नवीन उदयाला आल्या. त्यामुळे नर्सिंग प्रॅक्टीस प्रभावित होत आहे. प्रशिक्षण व्यवसायाच्या सुरुवातीला परिचारिका प्रशिक्षित करणे अतिशय प्राथमिक होते. सुरुवातीस प्रशिक्षणाची आवश्यकतादेखील जाणवत नव्हती. काळजीवाहू प्रशिक्षण आयोजित केले जात नव्हते. १८०० च्या काळात फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी ब्रिटनमध्ये पहिले परिचारिका विद्यालय स्थापन केले. त्यात महिलांना काळजीवाहू परिचारिकेचे प्रशिक्षण दिले जात होते. तसेच, बाळाचा जन्म व प्रसूतीदरम्यानचा काळ यात आई व बाळाची काळजी कशी घ्यायची, हे शिकवले जात होते. त्यानंतर, वैद्यकीय क्षेत्रातील आमूलाग्र क्रांतीमुळे प्रशिक्षणाची गरज नाइटिंगेल यांना वाटू लागली. याव्यतिरिक्त वेगवेगळे स्पेशलायझेशन कोर्सेस उपलब्ध आहेत जसे की, कार्डिओपल्मोनरी नर्स, आॅन्कोलॉजी नर्स, पेडिअ‍ॅट्रीक नर्स, सायकिअ‍ॅट्रीक नर्स, पब्लिक हेल्थ नर्स. पूर्वीची नर्सिंग प्रॅक्टीस व आधुनिक नर्सिंग प्रॅक्टीसमधील फरक पाहिला तर बराच गॅप दिसतो. पूर्वी रुग्णांना व आरोग्यसेवेकडे बघण्याचा नर्सेसचा दृष्टिकोन क्युरेटिव्ह (उपचारात्मक) होता. परंतु, आता सर्वांगीण म्हणजेच प्रतिबंधात्मक, आरोग्यवर्धक, निदानात्मक, उपचारात्मक व पुनर्वसनात्मक आहे. पूर्वी रुग्णांना बेसिक नर्सिंग केअर दिली जायची. आता तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीने दिली जाते. नर्सिंगच्या प्रशिक्षणामुळे नर्सिंग प्रॅक्टीसच्या कौशल्यात सुधारणा झाली आहे. नर्सिंग पूर्वी एक व्यवसाय व समाजसेवा होती. आता नर्सिंग हे प्रोफेशन असून ज्याला काही नियम-अटींची मर्यादा आहे. नर्सेसच्या जबाबदाऱ्यांमधील बदल हे क्षेत्रातील काही बदलांवरूनच होतात. ज्यामध्ये अधिक व्यापक प्रशिक्षण, महिलांचे विचार बदलणे आणि वैद्यकीय व्यावसायिकांची गरज वाढणे, हे आहे. जेव्हा परिचारिकांसाठी प्रशिक्षण आवश्यक बनले, तेव्हा रुग्णांच्या आरोग्याबाबत निर्णय घेण्यास त्या अधिक सक्षम बनल्या. व्यापक कौशल्याचा वापर करून विज्ञानावर आधारित शुश्रूषा करण्यास त्या सक्षम बनल्या. (शब्दांकन : प्रज्ञा म्हात्रे)सध्या नर्सिंगमध्ये असणारे शैक्षणिक कोर्सेसएएनएमदोन वर्षेसर्टिर्फिकेट कोर्सजीएनएमतीन वर्षेडिप्लोमा कोर्सआरजीएनएमसाडे तीन वर्षे डिप्लोमा कोर्सबीएससी नर्सिंगचार वर्षेडिग्री कोर्सपीबीएससी नर्सिंगदोन वर्षेजीएएम नंतर-डिग्री कोर्सएमएससी नर्सिंगदोन वर्षेडिग्रीनंतर मास्टर डिग्रीएम.फील.एक वर्षफिलोसॉफरपीएच.डी.तीन वर्षेडॉक्टरेट