शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आता जिल्हास्तरावर स्वतंत्र महिला तपास पथक - गृहविभागाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 19:45 IST

विनयभंग, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार आदी प्रकारच्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या सखोल तपासासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र महिला पोलीस तपास पथक स्थापन करण्यात येणार आहे.

अमरावती : विनयभंग, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार आदी प्रकारच्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या सखोल तपासासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र महिला पोलीस तपास पथक स्थापन करण्यात येणार आहे. संबंधित आरोपींविरूद्ध तत्काळ खटले दाखल करण्यासाठी या पथकात अधिकारी-कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात येईल. गृहविभागाने राज्यातील पोलीस अधीक्षकांना याबाबत सूचना वजा निर्देश दिले आहेत. 

महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे संवेदनशील असून ती तातडीने हाताळणे, विहित कालावधीत शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणे, गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृतीसाठी पुणे ग्रामीण यवतमाळ आणि अहमदनगर हे जिल्हे वगळून उर्वरित जिल्ह्यांमध्ये हे स्वतंत्र महिला पोलीस तपास पथक कार्यान्वित राहील.

गुन्हे तपास पथकात पोलीस उपअधीक्षक (आर्थिक गुन्हे), ४ पीआय, एपीआय व पीएसआय, २ पोलीस हवालदार, २ पोलीस नाईक व ८ पोलीस शिपाई राहतील. पथकासाठी आवश्यक असलेले १७ अधिकारी-कर्मचारी पोलीस अधीक्षकांनी उपलब्ध करून द्यावेत व ही शाखा त्वरित कार्यान्वित करावी, असे निर्देश गृहविभागाने दिले आहेत. ही शाखा दोन गटांमध्ये कार्यरत असेल. प्रत्येक गटाचे प्रमुख हे पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी असतील. या दोन्ही गटांवर पोलीस अधीक्षक यांच्यानंतर पोलीस उपअधीक्षक (आर्थिक गुन्हे) यांचे नियंत्रण राहील. गट १ मधील युनिटचे कार्यक्षेत्र बलात्कार, अपहरण, विनयभंगाचे प्रकार आणि महिलांवरील इतर गंभीर गुन्हे असे राहील. गट २ चे कार्यक्षेत्र हुंडाबळी, हुंड्याशी संबंधित आत्महत्या आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत उद्भवणारे इतर गुन्हे, कौटुंबिक हिंसाचार या बाबींचा समावेश असेल.

तपास पथकाचे कार्य- महिला व बालकांवरील गुन्ह्यांच्या सद्यस्थिती संदर्भात आढावा घेणे व वेळेवर दोषारोपपत्र पाठविण्यासंदर्भात पाठपुरावा.- अपराधसिद्धता वाढविण्यासाठी उपाययोजना.- केंद्र व राज्य शासनाने महिलांवरील अत्याचार/गुन्हे यासंदर्भात पारित केलेल्या अधिनियमातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाही- महिलांवरील अत्याचारांबाबत दाखल होणाºया गुन्ह्यांचा तपास त्वरित करण्याच्या दृष्टिकोनातून संबंधितांना प्रशिक्षण- महिलांच्या संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना- महिलांच्या संरक्षणासंदर्भात जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने कार्यशाळा, चर्चासत्र व विशेष मोहीम- महिलांच्या संरक्षणासंदर्भात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधून त्यांना सहकार्य व मार्गदर्शन

टॅग्स :Policeपोलिस