शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता सरकार सर्वांना ‘आनंदी’ ठेवणार! लवकरच नवीन मंत्रालयाची स्थापना : चंद्रकांत पाटील यांच्यावर जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 06:48 IST

नापिकी, बोंडअळी अन् गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्रासलेले शेतकरी, नोक-या मिळत नसल्याने वैतागलेले बेरोजगार, जीएसटीच्या त्रासामुळे संतापलेले व्यापारी आणि भाववाढीत भरडली जात असलेली सर्वसामान्य जनता या सर्व समाजघटकांना सदोदित ‘आनंदी’ ठेवण्याचा निर्णय

समीर देशपांडे कोल्हापूर : नापिकी, बोंडअळी अन् गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्रासलेले शेतकरी, नोक-या मिळत नसल्याने वैतागलेले बेरोजगार, जीएसटीच्या त्रासामुळे संतापलेले व्यापारी आणि भाववाढीत भरडली जात असलेली सर्वसामान्य जनता या सर्व समाजघटकांना सदोदित ‘आनंदी’ ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नागरिकांना आनंदी ठेवण्यासाठी लवकरच नवे मंत्रालय सुरू होत असून याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवण्यात येणार आहे.जगभरामध्ये ‘आनंदाचा निर्देशांक’ ही संकल्पना आता महत्त्वाची मानली जात आहे. एखाद्या देशातील, राज्यातील नागरिक किती आनंदी आहेत यावर हा निर्देशांक काढला जातो. गतवर्षीच्या जागतिक अहवालामध्ये नॉर्वे हा देश यामध्ये पहिल्या क्रमांकावर असून भारत १२२ व्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेशमध्ये अशाप्रकारे नागरिकांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले असून याच धर्तीवर महाराष्ट्रातही असे मंत्रालय सुरू करण्यात येणार आहे.सध्या नवीन मंत्रालयाचे कच्चे प्रारूप तयार करण्यात आले आहे. या मंत्रालयासाठी लागणारा निधी, आवश्यक अधिकारी-कर्मचारी वर्ग ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम रूप देण्यात येईल.सामान्याला आनंद देणा-या बाबी करू-जगण्याच्या संघर्षामध्ये अनेक छोटे-मोठे आनंद घेण्यापासून नागरिक हिरावले जातात. तोच आनंद त्यांना मिळवून देण्यासाठी या विषयासाठी वाहिलेले नवीन मंत्रालय स्थापन करण्यात येणार आहे. मदत आणि पुनर्वसनांतर्गतच ते राहणार असल्याने त्याचा कार्यभारही माझ्याकडे असेल. सामान्याला आनंद देणा-या अनेक बाबी आम्ही या माध्यमातून करू, असे महसूल, मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारchandrakant patilचंद्रकांत पाटील