शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आता ताडोबा व्याघ्र प्रकल्पात करा इंटर्नशीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 06:03 IST

वनसंपदा संवर्धनाचे अनेक उपक्रम सुरू

चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आता वन्यजिवांची आवड असणाऱ्यांना इंटर्नशीप करण्याची संधी उपलब्ध करून मिळणार आहे. या नावीन्यपूर्ण प्रयोगामुळे वन्यजिवप्रेमींच्या अनुभवात भर पडणार असून, विविध कौशल्यात पारंगत होत असतानाच ताडोबातील नैसर्गिक आनंद घेता येणार आहे.ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने आंतरराष्ट्रीय मानकानुसार वन्यजीव संरक्षण व वनसंपदा संवर्धनाचे अनेक उपक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे वाघ व तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढली. ताडोबा सफारीसाठी आले की वाघाचे दर्शन होणारच, याची खात्री असते. याच कारणांमुळे देश-विदेशातील सेलिब्रिटींपासून सामान्य नागरिकही ताडोबाच्या सफारीसाठी येतात. पर्यटकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन ताडोबा व्यवस्थापनाने मार्च ते जून २०२१ या कालावधीत वन्यजीवप्रेमींसाठी इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करू दिली आहे. इच्छुकांना २५ प्रेब्रुवारी २०२१ पर्यंत ताडोबाच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करता येणार आहे.कुणाला मिळणार प्राधान्य ?पर्यटन, बांधकाम, वास्तुरचना, सोशल मीडिया, माहिती-तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवर्धन अशा पाच शाखांमध्ये इंटर्नशिप करण्याची परवानगी देण्यात आली. शिवाय, कोणत्याही विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवीप्राप्त विद्यार्थ्यांची तयारी आदी अर्हता असणारेही याकरिता अर्ज सादर करू शकतात. इंटर्नशिप कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ताडोबा व्याघ्र व्यवस्थापनाकडून अनुभव प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प