शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आता पंचांग फाडून टाका, सण वगैरे थोतांड असून ते बंद करा, असे आदेश निघायचेच बाकी - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 04:20 IST

आता पंचांग फाडून टाका, सण वगैरे थोतांड असून ते बंद करा, असे आदेश निघायचेच आता बाकी आहे. हा आदेशही हवा तर काढा.

मुंबई : आता पंचांग फाडून टाका, सण वगैरे थोतांड असून ते बंद करा, असे आदेश निघायचेच आता बाकी आहे. हा आदेशही हवा तर काढा. तशीही आपल्याकडच्या सणांची रया गेलीय, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फटाक्यांवरील निबंर्धांवरून नाराजी व्यक्त केली. दक्षिण मुंबईत बुधवारी मेट्रोच्या कामाची पाहणी त्यांनी केली. यावेळी बोलताना त्यांनी फटाके बंदीच्या निर्णयाला जोरदार विरोध केला. शांततेचा अतिरेक झाला, तर एक दिवस असंतोषाचा स्फोट होईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.फटाकेबंदीबाबतच्या निर्णयानंतर अनेक स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे राज्य शासन प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प करत आहे. शाळकरी मुलांना तशा शपथाही दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सणांवरील अतिक्रमणांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. खुद्द उद्धव ठाकरेंनीच शिवसेनेची भूमिका स्पष्ट केल्यानंतर, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनाही फटाकेबंदी करणार नाही, केवळ जनजागृती करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, मेट्रोच्या कामासाठी महापालिकेची परवानगी लागणार नाही, असे होऊन चालणार नाही. महापालिकेच्या परवानगीची गरज इतर ठिकाणी लागते, तर येथेही परवानगी घेणे गरजेचे आहे. महापालिकेच्या अधिकारांवर गदा येईल, असा कोणताही प्रस्ताव आम्ही मान्य करणार नाही. महापालिका आणि सरकारने हातात हात घालून काम केले पाहिजे, तरच विकास होईल. खरे तर नगरविकास खात्याने मेट्रोला विशेष दर्जा देण्याचा प्रस्ताव महापालिकेत माहितीसाठी पाठविला आहे. तो मंजूर वा नामंजूर केला, तरी मेट्रोला विशेष दर्जा प्राप्त होणारच आहे, असेही ठाकरे म्हणाले.मेट्रो-३ चे काम सुरू असताना इमारतींना हादरे बसत आहेत. मात्र, मेट्रोचे अधिकारी पुरेशी काळजी घेत असल्याचा निर्वाळाही ठाकरे यांनी दिला. आरेच्या परिसरात होत असलेल्या मेट्रोच्या कामाबाबत आपण समाधानी नाही. मी लवकरच या भागात दौरा करून पाहणी करणार आहे. या पाहणीनंतरच माझे मत व्यक्त करेन. तिथे निसर्गाची हानी होत असेल, तर शिवसेनेचा विरोध कायम असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना