शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आता बालभारतीही बोलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 06:24 IST

व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातूनशिक्षक-विद्यार्थ्यांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बदलत्या तंत्रज्ञानानुसार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ अर्थात बालभारतीही आता कात टाकत आहे. या पार्श्वभूमीवर बालभारतीने ई-लर्निंग साहित्य निर्मितीबरोबरच ई- बालभारती प्रकल्पांतर्गत राज्यातील ७२५ शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम ही योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या उपक्रमातून शिक्षणाचा दर्जा वाढवणे आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, हे उद्दिष्ट साध्य केले जाईल. व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून दुर्गम भागातील शाळांमधील विद्यार्र्थ्यांबरोबरच शिक्षकांशीसुद्धा व्हीसॅट सोल्युशनच्या तंत्रज्ञानाने संवाद साधला जातो. त्यामुळे आता बालभारतीही स्वत: विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधणार आहे.बालभारतीच्या या व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन शुक्रवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. त्यांनी सांगितले की, या प्रकल्पाची अंमलबजावणी व्हॅल्युएबल ग्रुपया व्हीसॅटवर आधारित संवादरूपी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यात येईल. समान आणि दर्जेदार शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. शैक्षणिक प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा असून या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा वाढण्यास कशी मदत होईल, त्याचा विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी आणि शिक्षकांना अध्यापनासाठी कसा उपयोग करून घेता येईल, याकडे शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.बालभारतीच्या या व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून राज्यातील अनेक शाळांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. याअंतर्गत एका स्टुडिओद्वारे संपर्क स्थापित केला जातो. या स्टुडिओच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या क्लासरूमद्वारे भौगोलिक भागातील दुर्गम शाळांमध्येही दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल. त्यांना अत्याधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात प्रवाही करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.या शिवाय यातून कोणत्याही एका विषयावर नव्हे तर सर्वच विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना याचा फायदा होईलच, शिवाय शिक्षकांनाही आधुनिक शिक्षण क्षेत्रातील प्रायोगिक व प्रात्यक्षिक पद्धतीने ज्ञानग्रहण करता येईल, असे गायकवाड यांनी सांगितले.आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नविद्यार्थी हे राष्ट्राचे आणि समाजाचे भवितव्य असल्याने केवळ शिक्षणमंत्री म्हणून नव्हे, तर शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांना सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. सोबतच मुलांनी शिक्षणाबरोबरच आपल्यातील अन्य गुणांनाही वाव दिला पाहिजे, ज्यामध्ये कला-क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राचा समावेश आहे.- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

टॅग्स :Educationशिक्षण