शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आता सौम्य, मध्यम कोरोना रुग्णांवरही आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 03:29 IST

राज्य सरकारकडून हिरवा कंदील, मार्गदर्शक सूचना जाहीर

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारकडून विविध टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. या टास्क फोर्समधील विविध शाखेतील तज्ज्ञांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवरील उपचारांविषयी निर्णय घेण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील आयुष टास्क फोर्सने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून आता राज्य सरकारने कोरोना रुग्णांवर आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार करण्यास मान्यता दिली आहे. तसेच, राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंबंधी प्रमुख मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रकही बुधवारी जाहीर केले.

कोरोना रुग्णांसाठी सरकार युद्धपातळीवर उपाययोजना करीत आहे. मात्र, असे असताना या आजारावर उपचार करण्यासाठी प्रभावी औषध तयार झालेले नाही. हे लक्षात घेऊन आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी डॉक्टरांनी व त्यांच्या विविध संघटनांनी कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधांचा वापर करू देण्याची मागणी सरकारकडे केली होती, त्यानुसार टास्क फोर्सने सूचविलेल्या मार्गदर्शक सूचनांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.याविषयी, आयुष टास्क फोर्सचे सदस्य डॉ. जसवंत पाटील यांनी सांगितले, आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधे हे मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करते. त्यामुळे या मार्गदर्शक सूचनांनुसार डॉक्टर रुग्णांवर उपचार करू शकणार आहेत. सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथीकडूनही या उपचारांना मान्यता मिळाली आहे. अ‍ॅलोपॅथी उपचार प्रक्रिया सुरू असताना या औषधांचीही मदत घेता येईल. या उपचार पद्धतीची विशेष बाब म्हणजे प्रत्येक रुग्णाच्या लक्षणांनुसार यात औषधांचा समावेश आहे. सौम्य किंवा मध्यम लक्षणे असतानाच कोरोना रुग्णांवर या उपचार पद्धतीचा अवलंब केल्यास रुग्ण गंभीर स्थितीत जाणार नाही किंवा भविष्यात जीवाला निर्माण होणारा धोकाही टळण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAyurvedic Home Remediesघरगुती उपाय