शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आता सर्व हिंदू माझा बंधू! मोहन भागवतांची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 04:33 IST

भारतातील मुसलमानांनी मंदिरे तोडली नाहीत, ते काम बाहेरच्या मुसलमानांनी केले. आमच्या देशातील तोडलेली मंदिरे चांगली करणे आमचे कर्तव्य आहे असे सांगत, तसेच राममंदिरच्या विषयाला स्पर्श करत ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी हाक

- शौकत शेखडहाणू  - भारतातील मुसलमानांनी मंदिरे तोडली नाहीत, ते काम बाहेरच्या मुसलमानांनी केले. आमच्या देशातील तोडलेली मंदिरे चांगली करणे आमचे कर्तव्य आहे असे सांगत, तसेच राममंदिरच्या विषयाला स्पर्श करत ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी हाक राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिली.विश्व हिंदू परिषदेच्या तलासरी प्रकल्प सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त रविवार, १५ एप्रिल रोजी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन डहाणूतील आसवे येथे दुपारी करण्यात आले होते. या वेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केले. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांताध्यक्ष देवकीनंदन जिंदाल, पालघर जिल्हा अध्यक्ष राजकुमार नागशेट हे या वेळी उपस्थित होते. या वेळी सवितानंदजी महाराज, तुंगारेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष सदानंद महाराज, त्र्यंबकेश्वरचे रघुनाथ महाराज, प्रशांत हरतलकर, अशोक चौगुले यांचे स्वागत आदिवासी पेंटिंग व पुष्प देऊन करण्यात आले.सरसंघचालकांच्या हस्ते आदिवासींच्या हिरवादेवाचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्र माला प्रारंभ झाला. मार्गदर्शन करताना सरसंघचालक म्हणाले की, हिंदूंना संमेलन भरवून सांगावे लागते, ही चांगली गोष्ट नाही. आपण हिंदू आहोत, आपण कुणालाही परके मानत नसून, द्वेष करत नाही. जागतिक कल्याणासाठी हिंदू हे जंक्शन आहे. स्वार्थाकरिता काहीजण हिंदूंमध्ये भेद करत आहेत. रामसेतू तुटला, तर काय फरक पडतो, राममंदिराची गरज काय? हे मुद्दे त्यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत.‘वनजन गाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी भागवत यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर, मोखाडा येथील वैदू भगत ज्ञानाला सार्वजनिक रूप देणारे नवसुदादा वळवी, चित्रांमधून हिंदुत्व टिकविणारे तलासरीचे हरेश्वर वनगा, वयम संस्थेचे कार्यकर्ते विनायक थाळकर यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.देशासाठी वेळ द्याआदिवासी कधीच कोणालाही शरण गेलेला नाही. सनातन वैदिक संस्कृती व धर्म जपण्याचे कार्य या समाजाने केले आहे. जगाची नाडी, भारताकडे आहे. आपल्या देशासाठी वेळ द्या. बुद्धी, शरीर आणि कुटुंबाचा संसार नीट ठेवल्यास देश सुरिक्षत राहील. जातपात, भाषाप्रांत न मानता ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी सवय लावा, असे भागवत म्हणाले. सामाजिक सेवा करा, असे आवाहन करताना ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाºयाने घेत जावे’, या विंदांच्या कवितेचा दाखला त्यांनी दिला.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMaharashtraमहाराष्ट्र