शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांना आता पदोन्नतीसाठी वय महत्त्वाचे ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 20:38 IST

सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय : ५०- ५५ वर्षांनंतर सेवेकरिता पुनर्विलोकन अहवाल आवश्यक

गणेश वासनिक, अमरावती : राज्य शासनाने सरकारी कर्मचाºयांना पदोन्नती देण्यासाठी नवीन आदेशानुसार ५५ वर्षे वयाचा आधार घेतला आहे. ५५ वर्षांनंतर पदोन्नतीदेण्यासंदर्भात कार्यालय अधीक्षकांचा पुनर्विलोकन अहवाल अनिवार्य केला आहे.   सामान्य प्रशासन विभागाने १ ऑगस्ट २०१९ रोजी पदोन्नतीसंदर्भात अंमलबजावणी करण्यासाठी सर्वच विभागांना आदेश जारी केले आहे. हा आदेश ५२ पानांचा असून, यापुढे पदोन्नती देताना नव्या नियमावलींचे पालन केले जाणार आहे. पदोन्नतींसाठी समितीचे गठन केले जाईल. ही समिती पदोन्नतीकरिता सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान बैठक घेईल. वर्ग १ च्या अधिकाºयांना पदोन्नतीसाठी सचिव दर्जाचे अधिकारी समितीचे अध्यक्ष असतील. वर्ग २ च्या अधिकाºयांसाठी उपसचिव, तर वर्ग ३ च्या कर्मचाºयांना पदोन्नतीसाठी विभागीय स्तरावरील अधिकारी अध्यक्ष राहतील. या समितीत मागसवर्गीय कर्मचारी समितीत सदस्य असणे अनिवार्य आहे. समितीने बैठक घेऊन पदोन्नतीचा आराखडा तयार करण्यासंदर्भात आदेश निर्गमित करण्यात आले आहे. शासनाच्या ४९ विभागांना यापुढे पदोन्नती समितीची बैठक घेण्यापूर्वी सदस्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.     पदोन्नतीसाठी आरक्षणाची टक्केवारी निश्चितखुल्या प्रवर्गातील उमेदवाराच्या पदोन्नतीसाठी एकास दीड अशी नियमावली आहे. अनुसूचित जातीसाठी एकास तीन, अनुसूचित जमातीकरिता एकास दोन तर व्हीजेएनटीसाठी एकास तीन असे उमेदवार ग्राह्य धरावे लागतील. पदोन्नतीसाठी राखीव जागांवर उमेदवार न मिळाल्यास ते पद रिक्त ठेवून उर्वरित उमेदवारांना पदोन्नती देणे क्रमप्राप्त आहे.    पदोन्नतीसाठी वय महत्त्वाचे ठरणारराज्य शासनाने काढलेल्या आदेशात पदोन्नतीसाठी वयाचा विचार करण्यात आला आहे. पदोन्नतीसाठी वय ५० ते ५५ वर्षे असल्यास अशावेळी संबंधिताना सेवेत ठेवायचे की नाही? हे कार्यालय अधीक्षकांच्या पुनर्विलोकन अहवालावर अंवलबून असेल. नव्या आदेशात कर्मचाºयांच्या पुढील सेवेबाबत कार्यालय अधीक्षकाने नकार दिल्यास त्यांना सेवेतून वगळले जाणार आहे. त्यामुळे कार्यालय अधीक्षकांच्या अधिकारात वाढ झाली आहे.     कर्मचाऱ्यांची पात्रता तपासणी राज्य सेवेतील कर्मचारी पदोन्नतीसाठी विचाराधीन असल्यास अशा कर्मचाºयांचे गोपनीय अहवाल, शैक्षणिक अर्हता, सेवा प्रवेश नियम, अनुभवधारण, तांत्रिक परीक्षा उत्तीर्ण नसेल किंवा परीविक्षाधीन कालावधी असमाधानकारक, वय ५० ते ५५ वर्षे असल्यास अशा पदोन्नतीस पात्र कर्मचाºयांना पदोन्नतीपासून नाकाराची मुभा समितीला दिली आहे.      

तावून सलाखून तपासणीसरळ सेवेतील उमेदवारांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण झाल्यास अशा उमेदवारांना ती कागदपत्रे समितीपुढे ठेवणे बंधनकारक केले आहे. याशिवाय कर्मचाºयांनी केलेले प्रशिक्षण, संचयन सचोटी तपासूनच पदोन्नतीचा विचार केला जाणार आहे. उमेदवारांना मराठी, हिंदी भाषा प्रमाणपत्राशिवाय पदोन्नती मिळणार नाही.     नव्या आदेशामुळे पदोन्नती कर्मचाºयांवर अनेक बंधने आली आहेत. कार्यालय अधीक्षकांच्या अधिकारात वाढ झाली आहे. यातून पात्र कर्मचाऱ्यांवर अन्याय होण्याची भीती आहे.     - नामदेव गडलिंग, अध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना, अमरावती

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारState Governmentराज्य सरकार