शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
5
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
6
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
7
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
8
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
9
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
10
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
11
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
12
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
13
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
14
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
15
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
16
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
17
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
18
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
19
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
20
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?

आता १६ वर्षांवरील मुलेही होणार ‘सुसाट’

By admin | Updated: September 28, 2016 05:20 IST

पेट्रोलपंपावर विनाहेल्मेट दुचाकीस्वाराला हटकल्यानंतर झालेल्या वादात वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना जीव गमवावा लागला होता. मात्र, या प्रकरणानंतरही धडा न घेतलेल्या सरकारने

- सुशांत मोरे,  मुंबईपेट्रोलपंपावर विनाहेल्मेट दुचाकीस्वाराला हटकल्यानंतर झालेल्या वादात वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना जीव गमवावा लागला होता. मात्र, या प्रकरणानंतरही धडा न घेतलेल्या सरकारने अल्पवयीनांना १०० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या ‘नॉन गियर’ दुचाकी चालवू देण्याची परवानगी देण्याचा विचार सुरू केला आहे. मोटार वाहन कायद्यात काही नव्या तरतुदी केल्या जाणार असून त्यात १६ ते १८ वयोगटातल्या मुलांना १00 सीसीपर्यंतच्या नॉन गियर दुचाकी चालवू देण्याची शिफारस केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने केली आहे. यासंदर्भात प्रत्येक राज्याच्या परिवहन मंत्र्यांसोबतही नुकतीच चर्चा करण्यात आली. यावर कॅबिनेटकडूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आता १६ ते १८ वयापर्यंतच्या मुलांना ५0 सीसीपेक्षा कमी क्षमतेची नॉन गियर दुचाकी चालवण्याचा परवाना दिला जातो. मात्र आता ५0 सीसी क्षमतेच्या दुचाकींचे उत्पादन होताना दिसत नाही. उलट ८0 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाकींचे उत्पादन होते. त्या पार्श्वभूमीवर शाळकरी व महाविद्यालयीन मुलांना परिसरात व बाहेरही दुचाकी चालवता यावी याचा विचार करून ५0 सीसी क्षमतेची अट शिथिल करण्याचा विचार सुरू आहे. परिवहनमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक१६ ते १८ वयापर्यंतची मुले ५0पेक्षा अधिक सीसी क्षमतेची दुचाकी चालवताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. दुचाकीस्वाराबरोबरच पालकांवरही कठोर कारवाई करण्याची सूचना केंद्राकडूनच राज्याच्या परिवहन विभागांना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आरटीओकडूनही त्याची अंमलबजावणी केली जात आहे. वाहतूक कायद्यांतील काही बदलांसंदर्भात प्रत्येक राज्यातील परिवहन मंत्र्यांना २१ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. बैठकीला राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते हेदेखील उपस्थित होते. जास्त सीसी क्षमतेची दुचाकी वेगाने धावू शकते. त्यामुळेच जास्तीत जास्त सीसी क्षमतेच्या दुचाकी घेण्याकडे तरुणांचा कल असतो. सध्या कमी क्षमतेच्या दुचाकी अस्तित्वात नसून त्यांचे उत्पादन जवळपास बंदच झाले आहे. त्यामुळे १६ ते १८ वयापर्यंतच्या मुलांना जास्त सीसी क्षमतेच्या दुचाकी चालवू देण्याची शिफारस केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने केली आहे. नवीन मोटार वाहन कायद्यात अशी शिफारस असून सर्व सूचनांसंदर्भात नवी दिल्लीत चर्चा करण्यात आली. - दिवाकर रावते, परिवहनमंत्री