शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मातोश्रीवरून आयफोनच्या ठाकरे गटाला सूचना! विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मात्र इन्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 09:16 IST

Maharashtra Politics: ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचा संशय असून यामुळे पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना मातोश्रीवरून खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्याच्या चर्चा गुरुवारी रंगल्या.

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचा संशय असून यामुळे पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना मातोश्रीवरून खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्याच्या चर्चा गुरुवारी रंगल्या. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र आयफोन वापरण्याच्या कोणत्याही सूचना नसल्याचे स्पष्ट केले असले तरी राज्य सरकारची यंत्रणा आमच्यावर नजर ठेवून असते असे वक्तव्य केले आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून २०१९च्या निवडणुकांत फोन टॅप झाल्याविषयी अधिवेशनांदरम्यान विधानसभा अध्यक्षांकडेही तक्रार करण्यात आली होती. जून २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर पुन्हा एकदा फोन टॅप होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार, नेते बाळासाहेबांची शिवसेनेच्या गळाला लागल्याने ठाकरे गटाकडून सावधगिरी बाळगली जात आहे. संवादासाठी अधिक सुरक्षित असलेला आयफोन वापरावा अशा सूचना थेट मातोश्रीवरून करण्यात आल्या.यावरून जोरदार चर्चाही रंगल्या, अखेर या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुढाकार घेतला.

काय म्हणाले दानवे?    अशा कोणत्याही सूचना नाहीत. राज्य सरकारची यंत्रणा आमच्यावर नजर ठेवून असते. एकमेकांना ही यंत्रणा निरोप देत असते. पण आम्ही त्याला घाबरत नाही. खुल्या दिलाने काम करतो. कोण नेते कुठे जातात, यावर नजर ठेवली जातेच. राज्य सरकार निश्चित दबाव टाकत आहे. याला नोटीस दे, त्याच्यावर गुन्हा दाखल क, हेच धंदे आहेत. मात्र याची भीती शिवसैनिकाच्या मनात नाही.     कुणीही गुन्हे दाखल करो, फोन रेकॉर्ड करो, याने आम्हाला फरक पडत नाही. मी विरोधी पक्षनेता म्हणून तसेच ठाकरे गटाचा कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करतो. कुणाला हव्या असतील तर मी स्वतः माझ्या ऑडिओ क्लिप देतो, असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAmbadas Danweyअंबादास दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरे